भाजपाशी युतीमुळे १ हजार कोटींचे रिटर्न गिफ्ट !
भाजपाशी युतीमुळे १ हजार कोटींचे रिटर्न गिफ्ट !
मुंबई, दि. ७ डिसेंबर ;
भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून सत्ता स्थापना होताच दोन दिवसातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जप्त केलेली बेनामी मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश आले आहेत. दिल्लीच्या आयकर विभाग न्यायाधिकरणाने अजित पवार यांची 1,000 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती मुक्त केली आहे.
आयकर विभागाने ७ ऑक्टोबर २०२१ रोजी छापा टाकून या मालमत्ता जप्त केल्या होत्या, त्यात अजित यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांचीही मालमत्ता आहे. मालमत्ता मुक्त करण्याचा आदेश देताना न्यायाधिकरणाने म्हटले आहे की, आयटी विभाग मालमत्तांमध्ये कोणत्याही बेकायदेशीर फेरफारचा पुरावा सादर करू शकले नाही. बेनामी व्यवहाराबाबतही खुलासा करण्यात आलेला नाही. सर्व व्यवहार बँकिंग प्रणालीतून झाले आहेत.
न्यायाधिकरणाने आधीच आपली भूमिका स्पष्ट केली होती परंतु 5 नोव्हेंबर 2024 रोजी आयकर विभागाने फेरयाचिका दाखल करून पुनर्विचार करण्याचे आवाहन केले होते,न्यायालयाने IT विभागाचे पुनरावलोकन अपील देखील फेटाळले आहे. बेनामी मालमत्ता प्रतिबंधक कायद्यान्वये आयकर विभागाने अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या मुंबईतील घरे आणि कार्यालयांची झडती घेतली होती.
