आमचे काम सर्वांना जोडण्याचे, तोडण्याचे नाही !
आमचे काम सर्वांना जोडण्याचे, तोडण्याचे नाही !
पोर्टब्लेयर दि. २६ डिसेंबर –
महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने आपण सामाजिक न्यायाच्या भुमिकेने काम करीत आहोत. प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. माझे काम सर्व जाती धर्मीयांना जोडण्याचे आहे तोडण्यासाठी आमचे काम नाही. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
पोर्टब्लेयर येथील महाराष्ट्र मंडळाच्या सभागृहात आयोजित सामाजिक न्याय परिषदेत प्रमुख अतिथी म्हणुन रामदास आठवले बोलत होते. यावेळी महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष गोरखनाथ पाटील सचिव अरविंद पाटील, रिपाइचें अंदमान निकोबार शाखेचे अध्यक्ष राहुल राम, डाँ. आंबेडकर असोसिएनचे अध्यक्ष एम.एन. राव, सुनिता पाटील आदी मान्यंवर उपस्थित होते.
प्रत्येक समाजाला सामाजिक आर्थिक न्याय मिळाला पाहिजे. भगवान बुध्दांनी सांगितल्याप्रमाणे तोडणे सोपे आणि जोडणे अवघड आहे. त्यामुळे आपण दोन समाजाला जोडण्याचे काम करीत आहोत. प्रत्येक समाजाला सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आपण काम करीत आहे.
पोर्टब्लेयर आणि अंदमान निकोबार मधील जनतेचे प्रश्न आपण सोडवत राहु. अंदमान निकोबारच्या पोर्टब्लेयरमध्ये येथील मराठी माणसांनी सुरु केलेल्या महाराष्ट्र मंडळाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1 कोटी रुपयांचा निधी मिळवुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तसे पत्र आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. ते मुख्यमंत्र्यांनी सुध्दा 1 कोटी रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले आहे. तो निधी लवकरच पोर्टब्लेयर येथील महाराष्ट्र मंडळाला आपण मिळवुन देवू असे आश्वासन रामदास आठवले यांनी यावेळी दिले.
महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सामाजिक न्यायाचा, सामाजिक समतेचा, सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याचा, विश्व बंधुत्वाचा, राष्ट्रीय एकात्मतेचा विचार वृध्दींगत करण्यासाठी आपण सतत कार्यरत राहु असे प्रतिपादन रामदास आठवले यांनी यावेळी केले.
