भगवान बुद्ध आशियाचे ज्ञानसुर्य !
भगवान बुद्ध आशियाचे ज्ञानसुर्य !
नवी दिल्ली, दि. २१ डिसेंबर –
महाकारूणिक तथागत भगवान बुध्दांच्या विचारांवर आपण श्रध्दा ठेवणारे असून मला लहानपणापासुन वडनगर येथील भिख्खु निवासामुळे बौद्ध धम्माच्या महती माहित आहे. बौध्द धम्माबद्दल आपणास आदर असून भगवान बुद्धांना संपूर्ण जग आशियाचा ज्ञानसुर्य मानते. पुजनीय भिख्खु संघ आल्याबद्दल आनंद वाटल्याची नम्र भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पुढाकारातुन अखिल भारतीय भिख्खु संघाच्या बौध्द भिख्खुंनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली.
संसदेतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बौध्द भिख्खु संघातील बौध्द भिख्खुंची भेट घडवुन दिली. फेब्रुवारीमध्ये दिल्लीत अखिल भारतीय भिख्खु संघाच्या विज्ञान भवन येथे आयोजित कार्यकमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण पुज्य भिख्खु संघाने दिले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वडनगर गावात भिख्खु निवास आहे तेथे चिनी प्रवासी युवान शँग येवून गेले होते. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतांना त्यांच्या कार्यालयात आणि घरी भगवान बुध्दांची भव्य मुर्ती स्थापन करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना भगवान बुध्दांच्या धम्माबद्दल आणि त्यांच्या विचारांबद्दल प्रचंड आदर आहे. फेब्रुवारीमध्ये नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे बौध्द भिख्खु संघाच्या सम्मेलनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ते निमंत्रण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्विकारल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.
अखिल भारतीय बौध्द भिक्खू संघाच्या शिष्टमंडळामध्ये पुज्य भदंत करुणानंद महाथेरो, पुज्य भदंत डाॅ. राहुलबोधी महाथेरो, पुज्य भिख्खुनंद विवेचन आणि पुज्य भदंत प्रज्ञादिप आदी होते.
