बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी करणा-यांना घरी बसवले.

0
IMG-20230715-WA0133

बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी करणा-यांना घरी बसवले..

मुंबई, दि. ६ नोव्हेंबर;

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात महायुती सरकारच्या बाजूने मतदारांनी कौल दिलेला आहे. महायुती सरकारमध्ये गेल्या वर्षभरामध्ये आम्ही केलेली विकासाची कामे आणि खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीने थांबवलेली कामे व थांबवलेले प्रकल्पांना पुन्हा एकदा चालना देण्याचे काम केले आहे आणि राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचे धोरण आम्ही आखले आणि तशी भूमिका घेतली म्हणून मतदारांनी कौल दिला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकांमधून महाविकास आघाडीपेक्षा कितीतरी पटीने जास्त सरपंच आणि सदस्य महायुतीचे निवडून आले आहेत. मी मुख्यमंत्री म्हणून आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमचे सर्व मंत्रिमंडळ यांनी आपापल्या परीने प्रत्येक भागामध्ये जनतेला लोकाभिमुख न्याय देण्याचे काम केले आहे. म्हणून हा निकाल आपण पाहतो आहे. आमच्या यशामध्ये सर्व समाजाने आम्हाला पाठबळ आणि आशीर्वाद दिला म्हणून हे शक्य झाले. या आधी महाविकास आघाडी सरकारची अडीच वर्षाची सुमार कामगिरी जनतेने पहिली. आमचे महायुती सरकार आल्यानंतर दररोज आमच्यावर टोमणे, आरोप-प्रत्यारोप करण्यात संपूर्ण वर्ष घालवले. विरोधकांनी आमच्या सरकारवर टीकाटिप्पणी आरोप केला नाही, असा एकही दिवस गेला नाही.

 

ज्या लोकांनी मतदारांशी बेईमानी केली, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, अशा लोकांना जनतेने नाकारले, त्यांना घरी बसवले आणि आमच्या महायुती सरकारला कौल दिला. घरी बसून राज्य चालवता येत नाही, हे लोकांनी दाखवून दिले. मतदारांचे आमच्यावर प्रेम आहे, आमच्यावर विश्वास आहे. म्हणून आमची जबाबदारी वाढली आहे, आम्ही आणखी काम करू, आम्ही महाराष्ट्रात आणखी उद्योधंदे आणू, तरुणांना रोजगार आणू, त्यांच्या हाती काम देऊ. ही विकासाची घोडदौड पुढे अशीच सुरु राहणार आहे कारण कामाचा वेग आम्ही वाढवला आहे. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत महायुतीला असेच यश मिळेल किंबहुना यामध्ये वाढ होईल आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये ४५ पेक्षा जास्त जागा आम्ही निवडून देऊ आणि मोदी साहेबांचे हात बळकट करू असे मी निश्चितपणे सांगू शकतो असेही शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *