जम्मू कश्मीरमध्ये ४ वर्षानंतरही निवडणूक का नाही?

0
images (98)

जम्मू कश्मीरमध्ये ४ वर्षानंतरही निवडणूक का नाही?

नवी दिल्ली, दि. ३ जुलै ;

जम्मू काश्मीर हे एक राज्य होतं त्याचं रुपांतर भाजपा सरकारने तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये केलं. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं होतं एक वर्षात तिथे निवडणूक घेतली जाईल. आज चार वर्षे झाली आहेत तिथे निवडणूक घेण्यात आलेली नाही. या सगळ्याला मनमानी म्हणायचं नाहीतर काय? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या ख्सदार सुप्रिया सुळें यांनी विचारला.

दिल्लीतल्या सेवा विधेयकावर संसदेत चर्चा होती त्यावेळी अनेक खासदारांनी भूमिका मांडली याच वेळी खासदार सुप्रियाताई सुळेंनीही आपली भूमिका मांडली आणि सरकारवर प्रश्नांच्या फैऱ्या झाडल्या आहेत.

अरविंद केजरीवाल यांना एक नियम आणि केंद्राला एक नियम हा कुठला न्याय आहे. दिल्लीच्या जनतेने अरविंद केजरीवाल यांना कौल दिला आहे. तिथे राज्यपाल ढवळाढवळ करत आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकार आम्हाला जनादेश मिळाला आहे म्हणून स्वतः गुणगान गातं आहे हा नेमका कुठला न्याय आहे असाही प्रश्न सुप्रिया सुळेंनी लोकसभेत विचारला आहे. लोकशाहीच्या मार्गाने अरविंद केजरीवाल यांना दिल्ली आणि पंजाबची निवडणूक जिंकता आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *