भुजबळ एक वादळ, पुन्हा एकदा मशाल पेटविण्याचे काम करा..

0
IMG-20221013-WA0138

भुजबळ एक वादळ, पुन्हा एकदा मशाल पेटविण्याचे काम करा..

मुंबई, दि. 13 ऑक्टोबर:

छगन भुजबळ यांना विधानभवनात १९८५ साली पाहण्याचा योग आला. त्यांची सभागृहातील एंट्री वादळी होती. विविध प्रश्नावर त्यांनी सभागृह गाजवत स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. १९९५ ला ते विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते होते, त्यावेळी भुजबळ नावाचे वादळ पहायला मिळाले.पुन्हा एकदा मशाल पेटवण्याचे काम भुजबळांना करायचे आहे. मशाल पेटवायला हात आहे व हातावर घड्याळ आहे, असे सांगत देश वाचवायचे काम पुन्हा तुम्हाला करायचे असे आवाहन, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

१९९९ ला दोन्ही कॉंग्रेगसची सत्ता येण्यास जे प्रमुख वक्ते होते त्यात भुजबळ हे अग्रभागी होते. सत्ता येण्यास वरचा क्रमांक भुजबळांचा होता. त्यावेळेस दोन्ही कॉंग्रेसची आघाडी व्हावी यासाठी त्यांचा मोठा वाटा होता.

काही नेते पुरोगामी होते पण प्रत्यक्ष राजकारणात हे विचार त्यांना पुढे नेत वाटचाल करणे जमले नाही म्हणून ते संपले पण भुजबळांनी पुरोगामी विचार व राजकारणात प्रॅक्टिकली अंमलात आणत वाटचाल केली. या दोन्ही बाबींचा त्यांनी सुंदर मिलाफ घातला. २००३ मध्ये आघाडी सरकार टिकवण्यात भुजबळांचा मोठा वाटा होता. समीर भुजबळ यांचीही साथ मिळाली. विलासराव देशमुख नेहमी म्हणायचे सरकार भुजबळांमुळे टिकले. आता देशात लोकशाही व संविधान धोक्यात आहे ते वचवण्याचे कम करावे लागणार आहे.

माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल म्हणाले की, महाराष्ट्रासह देशातील दिनदलित वंचित व उपेक्षितांचे नेते व शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर काम करणारे छगन भुजबळ हे संघर्ष योध्दा आहेत. केवळ ओबीसींच नव्हे तर प्रत्येक समाजासाठी लढणारा योध्दा अशी भुजबळांची ओळख आहे. त्यांच्या ६१ चा सोहळा मुंबईतील शिवाजी पार्कवर मोठ्या जनसमुदायासमोर झाला होता. आज छगन भुजबळांचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने जमलो आहेत पुढे आपण त्यांची शंभरही साजरी करु असे त्यांनी यावेळी सांगितले.

छगन भुजबळ शिवसेनेत असतांना १९८५ साली मशाल चिन्हावर पहिले आमदार म्हणून निवडून आले होते. त्याचवर्षी नगरसेवक व मुंबईचे महापौर निवडले गेले होते. भुजबळांचा राजकीय प्रवास अतिशय मोठा आहे. त्यांचा शतकमहोत्सवही कार्यक्रम देखील आपण साजरा करु, त्यावेळी देखील मीच समन्वयक राहिल, असे सांगत त्यांनी छगन भुजबळांना ७५ वर्षपूर्ण केल्याबद्दल व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमदार कपिल पाटील व आभार प्रदर्शन आमदार सचिन आहिर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *