फिफ्टी-फिफ्टी…चलो गुवाहाटी…गद्दारांना ताटवाटी !

0
kk

फिफ्टी-फिफ्टी…चलो गुवाहाटी…गद्दारांना ताटवाटी !

मुंबई दि. १८ ऑगस्ट –

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणाबाजी करत विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

ओला दुष्काळ जाहीर करा नाहीतर खुर्च्या खाली करा… ईडी सरकार हाय हाय.. फसवी मदत जाहीर करणार्‍या सरकारचा धिक्कार असो… नही चलेगी… नही चलेगी दादागिरी नही चलेगी…सरकार हमसे डरती है ईडी को आगे करती है…फिफ्टी- फिफ्टी…चलो गुवाहटी… गद्दारांना ताटवाटी… चलो गुवाहाटी…चलो गुवाहाटी अशा घोषणाण्यात आल्या.

बुधवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधी पक्षाच्यावतीने आजही विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सरकारला धारेवर धरण्यात आले.

५० खोके… एकदम ओके… ईडी  सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय… बेकायदा सरकार हाय हाय…अशा घोषणांनी विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारला अक्षरशः हैराण करून सोडले. शिवसेनेत बंडखोरी करून जे आमदार गेले ते विधान भवनात ज्यावेळी येत होते त्यावेळी आले रे आले गद्दार आले…५० खोके एकदम ओके…अशा जोरदार घोषणा आक्रमकपणे दिल्या जात होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *