राष्ट्रवादीची समर्पित मागासवर्गीय आयोगास भेट

0
IMG-20220505-WA0048

राष्ट्रवादीची समर्पित मागासवर्गीय आयोगास भेट

मुंबई दि. 6 मे :
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने समर्पित मागासवर्गीय आयोगाची भेट घेतली. शक्य तितक्या लवकर इम्पिरिकल डाटा द्या अशी मागणी करत राज्य सरकार संपूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे आदी उपस्थित होते. याशिवाय समर्पित ओबीसी आयोगाचे अध्यक्ष आणि माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया,आयोगाचे सदस्य एच. बी.पटेल, पंकज कुमार,महेश झगडे, नरेश गीते, शैलेशकुमार दरोकर आदीही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *