असे असेल अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर!
मुंबई, दि 5 ऑगस्ट
अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर असावे हे करोडो लोकांचे स्वप्न आता पूर्ण होत असून 5 ऑगस्ट ला मंदिराचे भूमिपूजन होत आहे. या मंदिरासाठी लागणारे दगड, खांब बनवण्याचे काम अयोध्येतील कार्यशाळेत अनेक वर्षांपासून सुरू आहे. या भव्य दिव्य मंदिराचा आराखडा सोमपुरा या वास्तूविशारद यांनी बनवला आहे. याच सोमपुरा यांच्या वडीलांनी सोमनाथ मंदिराचा आराखडा बनवला होता.
अयोध्येत उभे राहत असलेले हे राम मंदिर कसे असेल याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
चला तर मग पाहुयात या भव्य राम मंदिराची रचना कशी आहे ते..

राम मंदिराचा पाया २० फूट ते २५ फूट खोल असेल तर मंदिराचा प्लॅटफॉर्म १२ ते १४ फुट असू शकतो.
हे मंदिर 2.75 लाख घन मीटर जमीनीवर बांधले जाणार आहे.
मंदिराची लांबी 270 फूट तर उंची 128 फूट तर 140 फूट रुंदी असेल.
मंदिरासाठी 330 बीम 212 खांब असतील.

या मंदिराला 5 दरवाजे असतील.
राम मंदिराची उंची ३३ फुटांनी वाढवण्यात आली असून आता मंदिर एकूण ३ मजल्यांचे असेल तर ५ घुमट असतील.
५ घुमटांच्या खाली एकूण चार भाग असतील. यात सिंहद्वार, नृत्य मंडप, रंगमंडप अशी रचना असेल.
यामुळे अयोध्येतील राम मंदिर आता अधिक भव्य दिसणार आहे.
गर्भगृहाच्या वरच्या भागावर मंदिराचे भव्य शिखर बनवले जाणार आहे.
राम मंदिरासाठी वापरण्यात येत असलेल्या दगडावर तिथेच कार्यशाळेत कोरीव काम करण्यात आले आहे.
प्रसिद्ध वास्तुकार निखिल सोमपुरा यांनी राम मंदिराचे डिझाईन तयार केले आहे.
सोमनाथ मंदिराचे जे वास्तूरचनाकार होते त्यांचा मुलगा आहे निखिल सोमपुरा.
मंदिराचा मुख्य दरवाजा पांढ-या शुभ्र संगमरवरी दगडाचा असेल.
गर्भगृहाच्या बरोबरवर 16 फुटाचा गाभारा असेल व त्यावर 65 फुटांच्या उंच शिखर असणार आहे.
अयोध्येतील राम मंदिर पूर्ण होण्यासाठी तीन-साडेतीन वर्ष लागतील.
