नागपूर, अकोल्यात भाजपाची आघाडीला धोबीपछाड!
नागपूर, अकोल्यात भाजपाची आघाडीला धोबीपछाड!
MLC निवडणुकीत भाजपा ४ तर आघाडी २ ठिकाणी विजयी.
मुंबई, दि. १४ डिसेंबर:
विधान परिषदेत निवडणुकीत भारतीय जना पक्षाने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे. नागपूरधून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय झाला. काँग्रेस उमेदवार मंगेश देखमुख यांचा त्यांनी परभाव केला तर अकोला-बुलडाणा-वाशिममधून वसंत खंडेलवाल यांनी शिवसेनेच्या गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव केला.
चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली. काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ तर भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले छोटू भोयर यांना केवळ एक मत मिळाले. महाविकास आघाडीची जवळपास १६ मते फुटल्याचे समोर आले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. भाजप नगरसेवक छोटू भोयर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी देण्यात होती मात्र, मतदानाच्या १२ तासांआधी काँग्रेसने उमेदवार बदलून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला. तीन टर्म विजय मिळवलेले शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी १०९ मतांनी पराभव केला.
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मुंबई, धुळे, अकोला व नागपूर या चार मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार विजयी ठरले तर कोल्हापूरातून काँग्रेस व मुंबईतून शिवसेनेचा एक उमेदवार विजयी ठरला. नागपूर व अकोला झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला तर इतर चार ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या. भाजपाचा विजय हा महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा आहे.
