सिद्धार्थनगरच्या रहिवाशांची पाणी समस्या सुटणार..

0
IMG-20211116-WA0025

सिद्धार्थनगरच्या रहिवाशांची पाणी समस्या सुटणार..

पाणी हक्क समितीच्या पाठपुराव्याला यश..

मुंबई, दि 16 नोव्हेंबर :
मुंबई महापालिका जल जोडणी विभागाचे सर्व निकषांची पूर्तता करूनही राजकीय दबावापोटी मागील पाच वर्षापासून सिद्धार्थनगर चार बंगला अंधेरी येथील 800 कुटुंबियांना कायदेशीर पाणी नाकारण्याचे धोरण के पश्चिम विभाग कार्यालयाने अवलंबले होते. हे महापालिका अधिकारी गरिबांच्या तोंडचे पाणी पळविन्याचे काम करत होते.

पानी हक्क समितीच्या सततच्या पाठपुराव्याने एकूण 80 सामाईक जल जोडण्याच्या अर्जांची तपासणी आणि इतर सोपस्कार यांची पूर्तता करत 36 जल जोडणीकरीता परमिशन फॉर्म देण्यात आले. याकरिता मोठी जल जोडणीची पूर्तता सुद्धा करण्यात आली. यामुळे अर्जदार रहिवाशांना आपल्याला कायदेशीर पाणी मिळनार असल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला मात्र मध्येच कुठे माशी शिकल्यामुळे सिद्धार्थ नगर मध्ये सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था असून सुद्धा नसल्याचे कारण दाखवत पाणी अधिकार नाकारला गेला.

गेली अनेक वर्ष पाठपुरावा करून आमच्या हक्काचा पाणी दाबून ठेवणाऱ्या प्रशासनाच्या कारभाराविरोधात अखेर पाणी हक्क समितीच्या नेतृत्वाखाली जल अधिकार सत्याग्रह सोमवार दिनांक 15 नोव्हेंबर 2021 रोजी महापालिकेच्या जलजोडनी जवळ सिद्धार्थ नगर अंधेरी चार बंगला येथे करण्यात आले. जल अधिकार सत्याग्रह जाहीर केल्यामुळे मुंबई महापालिकेचा कारभाराचा आडमुठेपणाचे धोरनाची दखल मुंबईतील प्रसिद्धीमाध्यमांनी घेतली, तरीही प्रशासनाने सत्याग्रह पूर्वी कोणताही ठोस निर्णय न घेता उदासीनता दाखविली.

याच उदासीनतेमुळे सिद्धार्थनगर येथील रहिवाशांनी मुंबईतील रे रोड सायन कोळीवाडा गौतम नगर जोगेश्वरी कुरार विलेज गणपत पाटील नगर रोड गोरेगाव युनिट नंबर 32 येथील रहिवाशांनी पाठिंबा देत पाणी हक्क समितीच्या आंदोलनाला नेतृत्वाखाली जल सत्याग्रह आंदोलनात भाग घेऊन पाणी अधिकाराची मागणी लावून धरली.

जल सत्याग्रहाच्या निमित्तानं स्थानिक पोलिसांच्या मध्यस्थीने के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री पृथ्वीराज चव्हाण व जलकामे आणि परिरक्षण विभागाचे सहाय्यक अभियंतांआणि शिष्टमंडळासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर शिष्टमंडळाच्या सोबतच्या चर्चेमधून सिद्धार्थ नगरच्या जल जोडणीसाठी प्रथमता सकारात्मकता दर्शवित माननीय महापालिका आयुक्तांच्या परवानगी करिता आजच प्रस्ताव देत असल्याचे व पुढील पंधरा दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळास देण्यात आले.

महापालिका प्रशासनाने दिलेल्या पंधरा दिवसांच्या मुदतीत जल जोडणी न मिळाल्यास पुढील जल सत्याग्रह आंदोलन तीव्र करण्याचा आणि माननीय आयुक्तांच्या भेटीसाठी मुलाबाळांसह सोबत महापालिका मुख्यालयात भेटीसाठी जाणार असल्याचे जयमती,अनिता भगत व प्रवीण बोरकर यांनी पाणी हक्क समितीच्या वतीने जाहीर केले.

पाणी हक समितीच्या जल सत्याग्रह आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता मर्जी संघटना, जनजागृती मंच ,होमलेस कलेक्टिव्ह, परछम संस्था तसेच रे रोड, युनिट नंबर 32, गौतम नगर जोगेश्वरी, सायन कोळीवाडा,कूरार व्हिलेज, दत्तानी पार्क कांदिवली येथील सहकाऱ्यांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहयोग दिला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *