अनिल देशमुखांवरील वसुलीचे पुरावे नाहीत !
अनिल देशमुखांवरील वसुलीचे पुरावे नाहीत !
मुंबई, दि. 3 नोव्हेंबर:
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा खळबळजनक आरोप करून गायब झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमविरसिंह यांनी आता वेगळीच भूमिका घेतली आहे. वसुली प्रकरणी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्राशिवाय आपल्याकडे आणखी कोणताच पुरावा नाही असे प्रतिज्ञापत्र त्यांनी चौकशी आयोगासमोर सादर केले आहे. आपल्याकडे या प्रकरणात सादर करण्यासाठी आणखी कोणतेही पुरावे नाहीत, असं त्यांनी आयोगाला सांगितले आहे. आयोगाच्या सुनावणीत परमबीरसिंग यांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्याची पुष्टी त्यांच्या वकिलाने केली.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी मार्च महिन्यात सरकारने निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांच्या एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती. आयोगाने परमबीरसिंग यांच्याविरुद्ध अनेक समन्स आणि जामीनपात्र वॉरंट जारी करूनही ते आतापर्यंत हजर झालेले नाही. परमबीरसिंग यांना आयोगानं तीनदा दंड ठोठावला होता.
गेल्या आठवड्यात, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या खंडणीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये
अनिल देशमुख हे काल ईडी कार्यालयात हजर होताच त्यांना अटक करण्यात आली व आज परमबीरसिंह यांनी पलटी मारली. तर दुसरीकडे परमबीरसिंग यांच्याविरुद्ध दोन अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले आहे. परमबीरसिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांनी एप्रिलमध्ये गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला तर परमबीरसिंह गायब आहेत. परमबीरसिंह यांच्या प्रतिज्ञापत्रामुळे या प्रकरणाला आता वेगळाच रंग आला आहे.
