लूज बॉल आला तर फटका मारायचाच !

0
IMG_20210531_214241

लूज बॉल आला तर फटका मारायचाच !

मुंबई, दि, ३० ऑक्टोबर :
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या एका सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार बॅटिंग करत विरोधकांना झोडपून काढले. क्रिकेटच्या भाषेत विरोधकांचा समाचार घेत आपण मुख्यमंत्रीपदावरून उत्तर बॅटिंग करतो हे दाखवून दिले.
‘लूज बॉल आला तर सोडायचा नाही, फटका मारायचाच.. तो सोडला तर संधी हुकलीच म्हणून समजा, ही गोष्ट क्रिकेट बघता बघता शिकलो आहे.राजकारणाच्या खेळपट्टीवरही तेच आवश्यक आहे, असे सांगतानाच, ‘आपणहून विकेट देणार नाही,’ असे टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाणला आहे.

वानखेडे स्टेडियमवर दिलीप वेंगसरकर स्टँडचे नामकरण, सुनील गावस्कर यांच्यासाठी हॉस्पिटॅलिटी बॉक्स तसेच माधव मंत्री यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गजांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, क्रिकेटर व्हावेसे वाटत होते पण आम्ही क्रिकेट पाहणारे झालो. क्रिकेट बघता बघता काही गोष्टी शिकता आल्या. लूज बॉल आला तर फटका मारलाच पाहिजे, तो जर का सोडला तर चान्स हुकला. राजकारणातही तेच लागू होतं. त्यामुळे आपणहून विकेट देणार नाही. क्रिकेट कळण्यासाठी ईस्ट स्टँडमध्ये बसावं लागतं, असं पवार साहेब सांगतात, पण आम्हाला क्रिकेट कळू नये म्हणून ते नेहमी व्हीआयपी स्टँडचा पास द्यायचे, अशी मिश्किल टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली. ‘मी ज्या स्टँडमध्ये बसतो तिथून स्विंग आणि स्पिन अचूक कळतात. ते बघत बघत मोठा झाल्यामुळं समोरच्या बॉलरनं टाकलेला स्विंग कोणत्या बाजूने जाणार आणि स्पिन कोणत्या बाजूने जाणार हे कळल्याने इथपर्यंत आलो, असा मिश्किल टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *