समीर वानखेडे गोत्यात,आर्यन खान प्रकरणी 25 कोटीची डील ?

0
20211004_142828

समीर वानखेडे गोत्यात,आर्यन खान प्रकरणी 25 कोटीची डील ?

मुंबई, दि. 24 ऑक्टोबर:
क्रूझ वरील छापेमारी प्रकरणात एनसीबीचे झोनल डायरेक्ट समीर वानखेडे यांच्या अडचणीत भर पडली असून आणखी एका दाव्यामुळे ही कारवाई खरेच होती, का बोगस कारवाई होती यावर संशय बळावत चालला आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील एनसीबीने साक्षीदार दाखवलेला के. पी. गोसावी याचा बाॅडीगार्ड प्रभाकर साईलने मीडियासमोर येत अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. आर्यन खान प्रकरणी २५ कोटी रुपयांची डील झाली होती, त्यातील ८ कोटी रुपये एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचाही दावा प्रभाकर साईलने केला आहे.

प्रभाकर साईल हासुद्धा या प्रकरणात एनसीबीने साक्षीदार दाखवला आहे. त्याने एक प्रतिज्ञापत्र केले असून यात सगळा घटनाक्रम सांगितला आहे. के. पी गोसावीने एनसीबीच्या कार्यालयातून आर्यन खानला कोणाशी तरी फोनवरून बोलण्यास सांगितले, तसा व्हिडिओ सुद्धा त्याने दाखवला आहे. एनसीबी ने त्याच्या को-या कागदावर सह्या घेतल्या होत्या असाही दावा त्याने केला आहे.

साईलने सर्व घटना सविस्तर सांगितला असून समीर वानखेडे व एनसीबीची क्रूझवरील कारवाई यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे समीर वानखेडे वादाच्या भोव-यात अडकले असून हे एक षडयंत्र तर नाही ना अशी शंका निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *