IMG-20210928-WA0002

मला सर्व स्तरावर खलनायक ठरविण्यात आले

परळी दि. 28 सप्टेंबर :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर मला सर्व स्तरावर खलनायक ठरविण्यात आले. लोकांच्या भावनिक प्रचारामुळे अनेकांनी मला शिव्या घातल्या, परंतु परळीच्या मातीतील माणसांनी मला उभारी दिली. पक्षाचे नेते खासदार शरद पवारसाहेब यांनी मला संधी दिली आणि आज मी राज्याचा मंत्री होऊ शकलो. या मातीचे व पक्षाचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले.

जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा तिसऱ्या पर्वात परळी मतदारसंघात आली असता धनंजय मुंडे बोलत होते.

या कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शिवकन्या सिरसाट, जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आमदार उषाताई दराडे, सुदामती ताई गुट्टे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, पक्ष निरीक्षक जीवनराव गोरे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयसिंह सोळंके, रामेश्वर मुंडे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, परळीच्या नगराध्यक्ष सौ. सरोजनी हालगे, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, गटनेते वाल्मिक अण्णा कराड, मतदारसंघ अध्यक्ष गोविंदराव देशमुख, राजेश्वर आबा चव्हाण, दत्ता आबा पाटील, परळी तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, पंचायत समिती सभापती बालाजी मुंडे, मार्केट कमिटीचे सभापती गोविंदराव फड, शिवाजी सिरसाट, वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांच्यासह महिला आघाडीच्या हेमाताई पिंपळे, जिल्हाध्यक्ष संगीताताई तुपसागर, प्रज्ञाताई खोसरे, रेखाताई फड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध आघाड्या व सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारिणीचे सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *