गायरान जमीन व भूखंड घोटाळ्यावरून आजी-माजी महसुलमंत्र्यांमध्ये आरोप प्रत्यारोप.

गायरान जमीन व भूखंड घोटाळ्यावरून आजी-माजी महसुलमंत्र्यांमध्ये आरोप प्रत्यारोप. मुंबई, दि. २७ डिसेंबर: गायरान जमीन वाटपातील घोटाळा व नागपूरमधील भूखंडाप्रश्नी आजी माजी महसूल मंत्र्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गंभीर आरोप केले त्याला थोरात यांनीही उत्तर दिले आहे. आपले भ्रष्ट चेले अब्दुल सत्तार … Read more

सीमावादाच्या ठरावातून कर्नाटकला जशास तसे उत्तर मिळाले नाही !

सीमावादाच्या ठरावातून कर्नाटकला जशास तसे उत्तर मिळाले नाही ! नागपूर, दि. २७ डिसेंबर: सीमाभागातील मराठी बांधवांना कर्नाटक सरकारने टार्गेट करत त्यांच्यावर अत्याचार केले, त्यांच्या गाड्या फोडल्या. महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबर बैठक झाल्यानंतरही कर्नाटकाने कुरापती थांबवल्या नाहीत. महाराष्ट्रातील मंत्री सीमाभागात जाऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती असताना सभागृहात ठराव मांडताना कर्नाटक सरकारला खडेबोल सुनवायला पाहिजे … Read more

गायरान जमीन प्रकरणी अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्या…

गायरान जमीन प्रकरणी अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्या… नागपूर, दि. २६ डिसेंबर : – कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पदाचा दुरुपयोग करून ३७ एकर गायरान भूखंड बेकायदेशीरपणे दिल्या प्रकरणी चौकशी करावी व त्रांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. २८९ अनव्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदर प्रकरण सभागृहाच्या निदर्शनास … Read more

…तोपर्यंत बेळगाव, कारवार सीमाभाग केंद्रशासीत प्रदेश करा !

…तोपर्यंत बेळगाव, कारवार सीमाभाग केंद्रशासीत प्रदेश करा! नागपूर, दि. २६ डिसेंबर: महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न विधिमंडळात गाजला. एक इंचही जागा देणार नाही ही कर्नाटकाची कौरवी वृत्ती आहे. कर्नाटक बेळगावात विधानसभा बांधते, उपराजधानी करते आहे आणि आमचे मुख्यमंत्री त्यावर ब्र सुध्दा काढत नाहीत. सर्वोच्च न्यायालयात जोवर हा विषय प्रलंबित तोवर हा कर्नाटकव्याप्त प्रदेश केंद्रशासित व्हायलाच हवा … Read more

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या आगळीकीला ‘जशास तसं’ उत्तर द्या..

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या आगळीकीला ‘जशास तसं’ उत्तर द्या.. नागपूर, दि. २६डिसेंबर  :- महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय होत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री जाणीवपूर्वक महाराष्ट्रविरोधी वक्तव्ये करुन महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला डिवचत आहेत. कर्नाटकच्या विधीमंडळात सीमाभागासंदर्भातील ठराव मंजूर करताना महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमान, अस्मितेला धक्का लावण्याचं काम झालं आहे.  कर्नाटकच्या या आगळीकीला ‘जशास तसं’ उत्तर दिलं पाहिजे, असं … Read more

अब्दुल सत्तार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा..

अब्दुल सत्तार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा.. नागपूर दि. २६ डिसेंबर :- सुप्रीम कोर्टाचा व राज्यसरकारच्या निर्णयाच्या सर्व बाबी समोर असताना एका व्यक्तीला त्यामध्ये फायदा मिळवून दिला आहे हा पदाचा दुरुपयोग आहे. ही बाब अतिशय गंभीर असून याप्रकरणाची जबाबदारी स्वीकारुन अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे त्यांनी राजीनामा नाही दिला तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची … Read more

मंत्री अब्दुल सत्तारांविरोधात फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करा..

मंत्री अब्दुल सत्तारांविरोधात फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करा.. नागपूर दि. २६ डिसेंबर: – राज्याच्या कृषीमंत्र्याने एका खाजगी व्यक्तीला गायरान जमीन देण्याची कृती केली आहे. हा विषय हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाने या मंत्र्यावर गंभीर ताशेरे ओढले आहेत. एखाद्या मंत्र्यांवर कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर सभागृहाच्या प्रथा – परंपरेनुसार यापूर्वी दोन मुख्यमंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले होते. त्यामुळे इतकी बेदरकार कृती … Read more

करमाळ्यातील रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजना मार्गी लावू.   

करमाळ्यातील रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजना मार्गी लावू. सोलापूर, दि. २६ डिसेंबर : राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे महत्वपूर्ण योगदान असून, राज्यात 14 लाख 87 हजार हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे. सोलापूर जिल्हा साखर पट्टा असून या भागाचा विकास महत्वाचा आहे. त्या पार्श्वभूमीवर रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजनेबाबत तात्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्यात येईल, … Read more

ज्याला संगीताची कदर त्याच्या सोबत ईश्वर…

ज्याला संगीताची कदर त्याच्या सोबत ईश्वर… मुंबई दि. २५ डिसेंबर : महम्मद रफी यांचा आवाज म्हणजे ईश्वरी जादू होती. त्यांनी आपल्या आवाजाने भजनेही अजरामर केली. असे गौरव उद्गार काढत पंडित हरिप्रसाद चौरसिया म्हणाले की, ज्यांना संगीताची कदर असते त्यांच्या सोबत ईश्वर असतो. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात प्रदीर्घ काळ सेवा करताना आपल्या बासरीच्या … Read more

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे विचार समाजासाठी दिपस्तंभासारखे.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे विचार समाजासाठी दिपस्तंभासारखे. औरंगाबाद, दि. २५ डिसेंबर : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे महाराष्ट्रासाठी मोठे योगदान असून विविध समाजोपयोगी उपक्रमांसोबतच वृक्ष लागवड, आरोग्य व स्वच्छता अभियानात प्रतिष्ठानने अतुलनीय कामगिरी केली आहे. समाजसेवेचा वारसा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढे जात असून राज्यासाठी ही गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. डॉ. नानासाहेब … Read more