महाराष्ट्राच्या कुस्तीला जपानच्या सुमोचा मदतीचा हात !

महाराष्ट्राच्या कुस्तीला जपानच्या सुमोचा मदतीचा हात ! मुंबई, दि. ४ फेब्रुवारी : भारत आणि जपान यांच्यातील संबंध पूर्वापार आहेत. ते अधिकाधिक दृढ होण्यास या करारामुळे मदतच होणार आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे आणि वैविध्यपूर्ण असे विविध अनेक प्रकल्प सुरु आहेत. या सर्वच क्षेत्रात जपानने सहकार्याचा हात पुढे केलेला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. जपान-भारत आणि महाराष्ट्र … Read more

जगण्याच्या तळमळीतूनच साहित्य व राजकीय नेतृत्वाची निर्मिती. 

जगण्याच्या तळमळीतूनच साहित्य व राजकीय नेतृत्वाची निर्मिती..   ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमलेनाचेमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन… वर्धा, दि. ३ फेब्रुवारी : जगण्याचे बळ देणारे साहित्यिक हे मुळात सामाजिक नेते असतात. जगण्याच्या तळमळीतून साहित्य आणि राजकीय नेतृत्व निर्माण होते. समाजाला दिशा देणाऱ्या या दोन्हींचे उगमस्थान साहित्यच आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील दिग्गजांच्या मार्गदर्शनाचा व सूचनांचा राज्य … Read more

कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान !

कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान ! मुंबई, दि. ३ फेब्रुवारी: सांस्कृतिक क्षेत्र असे एकच क्षेत्र आहे जिथे कलाकारांनी सादर केलेल्या कलेतून उपस्थित प्रेक्षकांना उर्जा आणि उत्साह मिळतो. गौरविण्यात आलेल्या कलाकारांनी वर्षानुवर्ष सेवाभावी वृत्तीने काम करुन कलेची उपासना केली. या अशा कलाकारांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार … Read more

तृतीयपंथायावरील देशातील पहिला विशेष उपचार कक्ष मुंबईत..

तृतीयपंथायावरील देशातील पहिला विशेष उपचार कक्ष मुंबईत.. मुंबई, दि. ३ फेब्रुवारी: तृतीयपंथी हा देखील समाजाचा एक घटक आहे. सबका साथ सबका विकास असे म्हणत असताना या घटकातील लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातला नाही तर देशातला पहिला तृतीयपंथासाठी विशेष कक्ष मुंबईतील जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित झाला असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी … Read more

गांधीजींचे विचार सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी

गांधीजींचे विचार सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी…. वर्धा, दि. ३ फेब्रुवारी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिनदुबळ्यांची सेवा करण्याचे काम केले. त्यांचे हे कार्य पुढे चालू ठेवण्याचे काम हे सरकार करीत आहे. गांधीजींचे विचार सर्वसामान्यांसाठी सर्वकाळ प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी सेवाग्राम येथील बापूकुटीस भेट देऊन बापूंना अभिवादन केले. त्यावेळी माध्यमांशी ते … Read more

विधान परिषदेच्या विजयाची पुनरावृत्ती विधानसभा व लोकसभेत करू.

विधान परिषदेच्या विजयाची पुनरावृत्ती विधानसभा व लोकसभेत करू. मुंबई, दि. ३ फेब्रुवारी ; विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जनतेने धुळ चारली असून महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त केला आहे. नागपूर, अमरावतीमध्ये काँग्रेसने भाजपा उमेदवारांचा दणदणीत पराभव केला आहे तसेच औरंगाबादमध्ये मविआ उमेदवाराने विजय संपादन केला आहे. खा. राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचाही या … Read more

कसबा पोट निवडणुक भाजपा- शिवसेना महायुती पूर्ण ताकदीने लढणार.

कसबा पोट निवडणुक भाजपा- शिवसेना महायुती पूर्ण ताकदीने लढणार. पुणे, दि. ३ फेब्रुवारी ; आ. मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेली कसबा विधानसभेची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाइं (आठवले गट), शिवसंग्राम, रासप, रयत क्रांती आदींसह महायुतीतील सर्व घटक पक्ष पूर्ण ताकदीने लढवायचा निर्धार आज करण्यात आला. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा सहयोगी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह … Read more

जनता महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या पाठीमागे ठाम उभी !

जनता महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या पाठीमागे ठाम उभी ! मुंबई दि. २ फेब्रुवारी – जनतेच्या मतांचा कल व मताधिक्य बघितले तर महाराष्ट्र किती मोठ्याप्रमाणावर महाविकास आघाडीच्या पाठीमागे एकसंघपणे उभा आहे हे चित्र यातून दिसून येते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महाविकास आघाडीला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळताना … Read more

नेमबाजीत महाराष्ट्राच्या ईशाला रौप्यपदक तर स्वराजला कांस्यपदक.

नेमबाजीत महाराष्ट्राच्या ईशाला रौप्यपदक तर स्वराजला कांस्यपदक. भोपाळ, दि. २ फेब्रुवारी : महाराष्ट्राच्या ईशा टाकसाळे हिने रौप्यपदक तर स्वराज भोंडवे याने कांस्यपदक पटकावीत नेमबाजीत महाराष्ट्राचे खाते उघडले. मुलींच्या दहा मीटर रायफल प्रकारात ईशा हिने सुरेख कौशल्य दाखवीत पदकावर आपले नाव कोरले. ती पनवेल येथे ज्येष्ठ प्रशिक्षिका सुमा शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे … Read more

सर्व बाल सुधारगृहात कौशल्यविकास केंद्र सुरू करणार..

सर्व बाल सुधारगृहात कौशल्यविकास केंद्र सुरू करणार… मुंबई, दि. २ फेब्रुवारी: बालकांना शिक्षणासोबतच आवश्यक कौशल्य विकसित होण्यासाठी कौशल्य विकास विभाग आणि महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे. मुंबई येथील चिल्ड्रन एड सोसायटीचे डोंगरी येथील निरीक्षण गृह व मानखुर्द येथील बालगृह येथे नव्याने सुरू केलेल्या कौशल्य विकास केंद्राच्या धर्तीवर राज्यातील बाल सुधारगृहांमध्ये कौशल्यपूर्ण शिक्षणाचे केंद्र सुरू … Read more