मविआ सरकारमुळे ओबीसी समाज राजकीय आरक्षणाला मुकला

मविआ सरकारमुळे ओबीसी समाज राजकीय आरक्षणाला मुकला… मुंबई, दि. 18 मे : महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाची हत्या केली आहे. महाराष्ट्रात निव्वळ राजकारण झाले. मंत्रीच मोर्चे काढत राहिले आणि निव्वळ भाषणे करीत राहिले. त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाज राजकीय आरक्षणाला मुकला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस पुढे म्हणाले की, आम्ही … Read more

ओबीसीप्रश्नी मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रालाही न्याय मिळेल !

ओबीसीप्रश्नी मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रालाही न्याय मिळेल ! मुंबई, दि. १८ मे : सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेश राज्यसरकारला ओबीसी आरक्षणासहित निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे हा निर्णय स्वागतार्ह असून महाराष्ट्राला देखील मध्यप्रदेश प्रमाणेच न्याय मिळेल असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. भुजबळ म्हणाले की, मागच्या सरकारच्या … Read more

… म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा !

… म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा ! मुंबई,  दि. १८ मे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य प्रदेश सरकारने झटपट एंपिरिकल डेटा गोळा करून ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळविले पण महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने मात्र अडीच वर्षे एंपिरिकल डेटा गोळा करण्यात टाळाटाळ करून ओबीसी राजकीय आरक्षणाची हत्या केली. मराठा समाजाचे अस्तित्वात असलेले आरक्षण … Read more

ओबीसी आरक्षण प्रश्नी मध्यप्रदेश जे करू शकते ते आपण का नाही?

ओबीसी आरक्षण प्रश्नी मध्यप्रदेश जे करू शकते ते आपण का नाही? मुंबई, दि. १८ मे : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का? असा खडा सवाल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केला आहे. आरक्षण देण्यासाठी सरकारमध्ये इच्छा आणि प्रयत्नांचा अभाव जाणवत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मध्य प्रदेश सरकारने सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणा … Read more

ओबीसी आरक्षणप्रश्नी मध्य प्रदेशाबाबत चार दिवसात काय चमत्कार घडला? 

ओबीसी आरक्षणप्रश्नी मध्य प्रदेशाबाबत चार दिवसात काय चमत्कार घडला? मुंबई, दि. १८ मे : ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारला परवानगी दिली आहे पण महाराष्ट्राच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतल्याचे दिसत आहे. चारच दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला ज्या सुचना केल्या होत्या त्याच सुचना मध्य प्रदेश सरकारलाही केल्या होत्या, मग चार दिवसात असा … Read more

‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील महामंडळाला’ भरीव निधी देणार

‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील महामंडळाला’ भरीव निधी देणार… मुंबई, दि. 18 मे : राज्यातील तरुणांना रोजगार, उद्योग, व्यवसायात संधी देऊन यशस्वी होण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल. ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’नी त्यांच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात, त्यांना योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. <span;>मराठा … Read more

काँग्रेसचे राज्यस्तरीय व राष्ट्रीय सोशल मीडिया शिबिर

काँग्रेसचे राज्यस्तरीय व राष्ट्रीय सोशल मीडिया शिबिर. मुंबई, दि. 18 मे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागातर्फे नागपूर येथे 28 व 29 मे रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय व राष्ट्रीय “नवसंकल्प सोशल मीडिया शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी 28 मे रोजी आयोजित राज्यस्तरीय शिबिरात काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व … Read more

दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानगंगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा

दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानगंगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. मुंबई, दि. 18 मे : मुक्त व दूरस्थ शिक्षण हे आधुनिक युगातील ज्ञानग्रहणाचे पसंतीचे माध्यम झाले आहे. आज अनेक खासगी विद्यापीठे व शिक्षण संस्था देखील दूरस्थ शिक्षणाचा उपयोग करीत आहेत. दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून मुक्त विद्यापीठाने शिक्षणाची ज्ञानगंगा जास्तीत जास्त गरीब व गरजू लोकांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन राज्यपाल … Read more

शिल्लक ऊसासाठी अनुदान हा भाजपाच्या आंदोलनाचा विजय

शिल्लक ऊसासाठी अनुदान हा भाजपाच्या आंदोलनाचा विजय…. मुंबई, दि. 17 मे : राज्य सरकारने गाळप न झालेल्या ऊसासाठी ७५ हजार रुपये मदत जाहीर करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीने आंदोलन केले होते. या आंदोलनाची राज्य सरकारला दखल घ्यावीच लागली व गाळप न झालेल्या ऊसासाठी प्रतिटन २०० रुपये अनुदान जाहीर करावे लागले. हे अनुदान अपुरे असले … Read more

वारंवार धाडी टाकण्यापेक्षा काँग्रेस नेत्यांच्या घराबाहेर सीबीआय, ईडीचे तंबूच ठोका !

वारंवार धाडी टाकण्यापेक्षा काँग्रेस नेत्यांच्या घराबाहेर सीबीआय, ईडीचे तंबूच ठोका ! मुंबई, दि. १७ मे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ती चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयने पुन्हा एकदा धाड टाकली. काँग्रेस नेत्यांच्या घरावर सातत्याने धाडी टाकल्या जात आहेत हे दुर्दैवी आहे. तपास यंत्रणांना निर्देश देऊन वारंवार धाडी टाकण्यापेक्षा मोदी … Read more