‘काशी विश्वेश्वर कॉरिडोर’चे लोकार्पण!

‘काशी विश्वेश्वर कॉरिडोर’चे लोकार्पण! वाराणसी, दि. १३ डिसेंबर: काशी विश्वेश्वर कॉरिडोरचे लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेब यांचा उल्लेख केला. या देशाची माती जगापेक्षा वेगळी आहे. याच महान भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूर आणि पराक्रमी राजे निर्माण झाले. औरंगजेबासारख्यांचे मनसुबे त्यांनी उधळून लावले. ही आपली शूरांची भूमी आहे असे पंतप्रधान … Read more

महाराष्ट्राच्या आकसातून मोदी सरकारने आणखी एक संस्था दिल्लीला हलवली !

महाराष्ट्राच्या आकसातून मोदी सरकारने आणखी एक संस्था दिल्लीला हलवली ! नागपूरमधले केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे कार्यालयही दिल्लीला गेले. मुंबई, दि. १३ डिसेंबर : केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महत्त्वाच्या संस्थांना महाराष्ट्राबाहेर हलवून महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये आता १९५८ मध्ये नागपूर येथे स्थापन झालेल्या केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे मुख्यालयही दिल्लीला हलवले. … Read more

भारताची हरनाज संधू ठरली ‘मिस युनिवर्स २०२१’!

भारताची हरनाज संधू ठरली ‘मिस युनिवर्स २०२१’! नवी दिल्ली, १३ डिसेंबर: भारताची हरनाज संधू ‘मिस युनिवर्स 2021’ ठरली आहे. इस्रायलमध्ये पार पडलेल्या या सौंदर्य स्पर्धेत हरनाजने हा किताब मिळवला. तब्बल २१ वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्सचा किताब पुन्हा मिळाला आहे. लारा दत्त व सुश्मिता सेन या दोघांनी याआधी हा किताब जिंकला होता. पराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या … Read more

तेव्हा भाजपचे खासदार डबलसीट सायकलवरून संसदेत जात !

तेव्हा भाजपचे खासदार डबलसीट सायकलवरून संसदेत जात ! मुंबई दि. १३ डिसेंबर : शरद पवार यांचे राजकारण संपले आहे असे देवेंद्र फडणवीस बोलले होते त्यावेळी चमत्कार घडला होता आणि आताही ते टीका करत आहेत… देवेंद्र फडणवीस टीका करतात त्यावेळी चमत्कार घडतो. त्यामुळे २०२४ मध्येही चमत्कार घडवून आणू , असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते … Read more

औसा शहराची विकास कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करा !

औसा शहराची विकास कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करा ! लातूर, दि. 13 डिसेंबर : लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे ऐतिहासिक शहर म्हणून औसा शहराची ओळख आहे. शहराला तसं पाहिलं तर दीड हजार पेक्षा जास्तीच्या वर्षाचा गौरवशाली इतिहास आहे. एवढी मोठी परंपरा महाराष्ट्रात फार कमी शहरांना पाहायला मिळते. औसा शहराच्या विकासात भर घालणारी विकास कामे करतांना दर्जेदार … Read more

गावांच्या विकासासाठी ‘नगरोत्थान’सारखी योजना राबविण्याचा मानस

गावांच्या विकासासाठी ‘नगरोत्थान’सारखी योजना राबविण्याचा मानस.. कोल्हापूर, दि. 13 कोल्हापूर : ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामविकास विभाग सदैव तत्परतेने काम करीत आहे. यापुढे पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या गावांच्या विकासासाठी नगरोत्थान योजनेसारखी योजना राबविण्याचा मानस असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले . हातकणंगले येथे बांधण्यात आलेल्या पंचायत समितीच्या नुतन इमारतीचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री मुश्रीफ … Read more

अष्टविनायक देवस्थानच्या रस्त्यांची सुधारणा लवकर होईल !

अष्टविनायक देवस्थानच्या रस्त्यांची सुधारणा लवकर होईल ! अलिबाग, दि.13 डिसेंबर : महाविकास आघाडीचे शासन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. देवस्थान अष्टविनायक आराखड्याबाबत चर्चा झाली असून अष्टविनायक देवस्थानच्या विकास आराखड्यांतर्गत लवकरच रस्त्यांची सुधारणा होण्याच्या दृष्टीनेही आवश्यक कार्यवाही केली जाईल असे आश्वासन विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गो-हे यांनी दिले. अष्टविनायक क्षेत्रापैकी महड येथील सुप्रसिद्ध … Read more

ओबीसी समाजाला हक्कापासून वंचीत ठेवता येणार नाही

ओबीसी समाजाला हक्कापासून वंचीत ठेवता येणार नाही.. मुंबई, 13 डिसेंबर : ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचीत ठेवता येणार नाही आणि ही बाजू आपल्याला न्यायालयात प्रखरपणे मांडावी लागणार असल्याचे मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव २७ टक्के जागांवर … Read more

सोनिया गांधी व शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त ‘सहस्त्रनामावली पुजा’

सोनिया गांधी व शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त ‘सहस्त्रनामावली पुजा’ मुंबई, दि. १२ डिसेंबर: काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा. सोनिया गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन त्यांच्या निरोगी दिर्घायुष्यासाठी श्री. सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे सहस्त्रनामावली पुजा करण्यात आली. सामाजिक व राजकीय कामात सतत अग्रेसर असणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव व … Read more

शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारावरच काम करतो !

शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारावरच काम करतो ! मुंबई, दि. १२ डिसेंबर : शाहू – फुले – आंबेडकर यांची दूरदृष्टी समाजाला पुढे नेण्याची होती त्यांच्या या दुरदृष्टीच्या सुत्रावरच आमचा राष्ट्रवादी पक्ष काम करतो, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. नेहरू सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांचा ८१ … Read more