कौशल्य आधारित शिक्षणासाठी इन्फोसिससोबत करार

कौशल्य आधारित शिक्षणासाठी इन्फोसिससोबत करार.. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती मुंबई, दि. 30 नोव्हेंबर : राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने इन्फोसिस कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र … Read more

मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख

मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख.. मुंबई, दि. ३० नोव्हेंबर: मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये देण्याच्या आश्वासनाची महाविकास आघाडीने पूर्तता केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकूण ३४ कुटुंबियांसाठी मदतीची रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आली आहे. सदर कुटुंबांना १० लाख रूपये देण्याची घोषणा मागील सरकारच्या काळात करण्यात आली … Read more

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत रहावी

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत रहावी मुंबई, दि. 30 नोव्हेंबर: कोविडच्या ओमायक्रॉन या विषाणुच्या प्रकाराचा संसर्ग रोखण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत रहावी जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल व संसर्गाला वेळीच रोखण्यात यश मिळेल असे सांगितले. ज्या देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला … Read more

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एका वर्षाची मुदतवाढ

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एका वर्षाची मुदतवाढ मुंबई, दि. 30 नोव्हेंबर : ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 12 महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अर्ज भरण्याच्या दिनांकापूर्वी ज्या व्यक्तीने आपल्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी पडताळणी समितीकडे अर्ज केला असेल परंतु नामनिर्देशन पत्र भरण्याच्या … Read more

परमविरसिंह व सचिन वाझे भेटीमागे कोण?

परमविरसिंह व सचिन वाझे भेटीमागे कोण? मुंबई, दि. 30 नोव्हेंबर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंह व सचिन वाझे हे चांदिवाल कमिशनसमोर चौकशीला जाण्यापूर्वी भेटले अशी माहिती मिळतेय हे नियमाला धरुन नाही. चौकशीला जाणारे दोन व्यक्ती वा आरोपी अशा प्रकारे भेटू शकत नाहीत अशी नियमावली आहे. मग अशा परिस्थितीत ते दोघे का भेटले? कशासाठी भेटले? … Read more

आघाडी सरकार विधिमंडळाला घाबरणारे

आघाडी सरकार विधिमंडळाला घाबरणारे. मुंबई, 29 नोव्हेंबर : कोरोनाच्या नावाखाली विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी कमी करणारे महाविकास आघाडीचे सरकार हे विधिमंडळाला घाबरणारे सरकार आहे, अशी धारदार टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केली. भांडारी यांनी सांगितले की, कोरोना संकटातून हळूहळू सर्वच व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. संसदेचे अधिवेशनही सुरु झाले आहे. मागील वर्षी आणि … Read more

ठाण्यातील मल्टी स्पेशालिटी हाॅस्पिटलसाठी आणखी 213 कोटी मंजूर

ठाण्यातील मल्टी स्पेशालिटी हाॅस्पिटलसाठी आणखी 213 कोटी मंजूर… मुंबई, दि. 29 नोव्हेंबर : ठाणे येथील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाचे रूपांतर मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीने हे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी 213 कोटींच्या सुधारित प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आधीचे 314 आणि आताचे 213 असे 527 कोटींचा निधी … Read more

राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून मिळालेल्या संधीचे सोने कराल !

राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून मिळालेल्या संधीचे सोने कराल ! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विनोद तावडेंना शुभेच्छा. मुंबई, दि. 29 नोव्हेंबर : जगातील सर्वात मोठा पक्ष असणा-या भारतीय जनता पार्टीचे अखिल भारतीय सरचिटणीस म्हणून मिळालेली जबाबदारी ही एक मोठी संधी असून त्याचं तुम्ही सोनं कराल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनियुक्त राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याशी बोलतांना … Read more

असंवेदनशील कारभारामुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले

असंवेदनशील कारभारामुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले. मुंबई, 29 नोव्हेंबर : महिलांच्या संरक्षणासाठी आघाडी सरकारकडून पोलीस आणि कायदेशीर यंत्रणेत आवश्यक त्या सुधारणा करण्याचे टाळले गेल्याने महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. कुर्ला येथे एका तरुणीचा बलात्कार करून खून करण्याची घटना राज्य सरकारच्या विविध यंत्रणांच्या अपयशामुळेच घडली आहे. आघाडी सरकारने महिलांना सुरक्षा देण्याच्या घोषणा करणे थांबवून … Read more

मोदी सरकारची महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक

मोदी सरकारची महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक.. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राची सतत आर्थिक कोंडी. मुंबई, दि. २९ नोव्हेंबर : केंद्रातील मोदी सरकार विरोधी पक्षांच्या सरकारांशी भेदभाव करत असून महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे काम करत असते. आरटीआय अंतर्गत मागविलेल्या माहितीनुसार अनुदान सहाय्यतेत मोदी सरकार महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक देत असल्याच्या आमच्या संशयाला पुष्टी मिळते आहे, असे महाराष्ट्र … Read more