• Thu. Mar 13th, 2025

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 1920 Today: 2 Total: 4116526

सोलापूर, दि. १३ जुलै २०२०

कोरोनाच्या संकटात आरोग्य सेवा कोलमडल्याचे आपण दररोजच वाचते पण काही ठिकाणी उत्तम दर्जाची सेवा कोरोना रुग्णांना दिली जात आहे. सोलापूर जिह्यातील माळशिरस तालुक्यातील महाळूंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड केअर सेंटर हे त्यापैकीच एक. या कोवीड केअर सेंटरला आयएसओ मानांकन मिळाले आहे. या सेंटरने ग्रामीण भागात उत्तम सुविधा देऊन एक आदर्शच निर्माण केला आहे.

कसे आहे महाळूंगचे कोविड केअर सेंटर…?

आरोग्य वर्धिनी इमारतीत अत्याधुनिक सोयी-सुविधायुक्त कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये हॅण्ड वॉश स्टेशन, ॲटोमॅटिक सॅनिटायझर यंत्रणा बसविण्यात आली आहे. आर.ओ. प्लांट, अखंडीत वीज पुरवठ्यासाठी जनरेटरची सुविधा लोकसहभागातून  करण्यात आली आहे. उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच स्वच्छतेसाठी पुरेसे मनुष्यबळ  24 तास उपलब्ध आहे. कोरोना बाधित रुग्ण व संशियत रुग्ण तपासणीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य अधिकारी कर्मचारी यांना पी.पी.ई.किट, फेस शिल्ड, एन 95 मास्क, हॅण्ड ग्लोव्हज् तसेच उपचारासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध आहे.

तालुक्यातील कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रातून अथवा इतर ठिकाणाहून संशयित रुग्णांना सेंटरमध्ये आणले जाते. तपासणीनंतर तो संशियत आहे का कोरोना बाधित रुग्ण आहे. त्यानुसार विभागणी करुन संस्थात्मक क्वारंटईन करण्यात येते. संशियत रुग्णांसाठी 34 बेडची तर कोरोना बाधित रुग्णांसाठी 18 बेडची व्यवस्था करण्यात आली. दाखल रुग्णांना प्राथमिक सुविधा देण्यात येतात. त्यामध्ये दैनंदिन वापरासाठी हॅण्डवॉश, सॅनिटायझर, मास्क, कपडयांचा व अंगाचा साबण, तेल, पावडर, टॉवेल, नॅपकिन आदी वस्तू दिल्या जातात. रुग्णांना पौष्टीक आणि सकस आहार दिला जातो. आहार प्रत्येकाला डिस्पोजेल प्लेट व ताटात  दिला जातो.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हाधिकारी यांनी महाळुंग येथील कोविड केअर सेंटरला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *