एबीपी माझाची ‘ती’ बातमी पूर्णपणे असत्य व चुकीची !

0
FB_IMG_1622374266056

एबीपी माझाची ‘ती’ बातमी पूर्णपणे असत्य व चुकीची !

बातमी दाखवण्यापूर्वी एबीपी माझाने खातरजमा करावी.

मुंबई, दि. १ जुलै :
एबीपी माझा या वृत्तवाहिनीने ऊर्जा विभागाच्या विरोधात पत्र लिहिल्याची दाखवलेली बातमी ही पूर्णपणे असत्य व चुकीची आहे. आपण ऊर्जा विभागाशी संबंधित पत्र लिहिले नसून ते पत्र खनिकर्म महामंडळातील टेंडरबाबत आहे आणि या महामंडळाचा ऊर्जा विभागाशी काही संबंध नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

एपीबी माझाच्या चुकीच्या बातमीचा समाचार घेताना पटोले म्हणाले की, ऊर्जा विभागाविरोधात पत्र लिहिल्याची खोटी बातमी दाखवून आमच्याच पक्षाचे मंत्री नितीन राऊत आणि माझ्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला, हे जबाबदार वृत्तवाहिनीला शोभणारे नाही. बातमी दाखवण्यापूर्वी त्याची खातरजमा करण्याच्या साध्या प्रक्रियेचे पालनही केले नाही. अशा प्रकारच्या निराधार, असत्य बातम्या दाखवण्याचे प्रकार भविष्यात होणार नाहीत याची खबरदारी वृत्तवाहिनीने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करत संबंधित पत्रही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *