बॉलिवूडला कोरोनाची लागण;अमिताभ-अभिषेक पॉझिटीव्ह !

0
AB AB

मुंबई, दि. १२ जुलै २०२०

कोरोनाची लागण आता बॉलिवूडलाही झाली असून अभिनेते अमिताभ बच्चन व अभिषेक पितापुत्रांना लागण झाली आहे. नानावटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार  केले जात आहेत. अमिताभ बच्चन यांनी स्वतःच ट्वीट करुन ही माहिती दिली. त्यांच्या घरातील जया बच्चन, ऐश्वर्या, आराध्या यांना मात्र लागण झालेली नाही. अमिताभ बच्चन यांना कारोनाची लागण झाल्याचे कळताच मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या पथकाने त्यांचा बंगला सॅनिटाईज केला.

अमिताभ यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले असतानाच दुसरीकडे एव्हरटाईम ग्लॅमरस हिरोईन रेखा यांचा बंगलाही सॅनिटाईज करुन सील करण्यात आला आहे. रेखा यांच्या बंगल्याच्या एका सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर बीकेसीमध्ये उपचार सुरु आहेत.

रविवारी सकाळी अभिनेता अनुपम खेर यांच्या घरातील चौघांना कोरोना झाल्याचे अनपुम खेर यांनीच ट्विट केले. अनुपम खेर यांच्या आई, भाऊ, वहिनी, पुतणी यांना कोरोनाची लागण झाली आहे.

रणधीर कपूर, नितू कपूर, रिद्धीमा कपूर, करण जोहर यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी पसरली होती परंतु आम्ही सर्वजण बरे आहोत कोरोनाची लागण झाली नसल्याचे रिद्धीमाने ट्वीट केले आहे.

याआधी बोनी कपूर यांच्या घरातील तीन नोकरांनाही कोरोनाची लागण झाली होती आता ते बरे झाले आहेत पण नोकरांना कोरोनाची लागण झाल्यामुळे जान्हवी, खुशी यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती, त्या टेस्ट निगेटिव्ह आल्या होत्या असे बोनी कपूर यांनी ट्वीट केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *