मराठा व ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारची भूमिका महत्वाची

0
FB_IMG_1624283293159

मराठा व ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारची
भूमिका महत्वाची

नाशिक, दि. 21 जून :
मराठा समाजाच्या आरक्षणासह ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सकारात्मक आहे. ज्या ज्या वेळेस विधिमंडळात याबाबत प्रश्न उपस्थित झाले त्या त्या वेळेस आम्ही पाठिंबाच दिला आहे. आज आरक्षणाचा प्रश्न हा दोन समाजातील नसुन हा व्यवस्थेविरुद्ध लढा आहे आणि त्याला माझा नेहमीच पाठिंबा असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

नाशिक शहरातील रावसाहेब थोरात सभागृहाशेजारील मैदानावर छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या मुक आंदोलनाला उपस्थित राहून छगन भुजबळ यांनी आपली भुमिका स्पष्ट करत मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला.

भुजबळ पुढे म्हणाले की, ‘ आज मराठा आणि ओबीसी दोन्हीही समाज अडचणीत आहेत, काही लोक जाणीवपुर्वक मराठा समाज व ओबीसी समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आमची दैवतं ही एकच आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर ही आमची दैवतं आहेत त्यामुळे कोणीही आमच्यात द्वेष पसरवण्याचे काम करू नये.

आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी सर्वांना एकत्रित करण्याची जी भुमिका घेतली आहे ती स्वागतार्ह आहे. सर्वांना एकत्रित करताना संभाजीराजे जी सामंजस्याची भुमिका घेत आहेत ती अत्यंत कौतुकास्पद आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला छत्रपती संभाजीराजे, यांच्यासह विविध पक्षांचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा आणि माझ्या पक्षाचा नेहमीच पाठिंबा राहीला आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही सर्व पक्षीय भुमिका असून माझी व माझ्या पक्षाची देखील हीच भुमिका आहे.त्या भूमिकेशी मी पुर्णपणे सहमत असून मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबाच आहे, असेही भुजबळ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *