महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन !

0
IMG_20210619_071514

महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन !

मुंबई, दि. 19 जून :
भारताचे महान धावपटू ‘फ्लाईंग सिख’ अशी ओळख असलेल्या मिल्खा सिंग यांचे वयाच्या ९१ वर्षी निधन झाले. मोहालीतील एका खासगी रुग्णालयात मिल्खा सिंग यांच्यावर करोनावरील उपचार केले जात होते. मात्र शुक्रवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या महिन्यात मिल्खा सिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते पण ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांना पुन्हा चंदीगडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मिल्खासिंग यांना श्रद्धांजली….

देशाचे महान धावपटू, ‘फ्लाईंग शीख’ मिल्खा सिंग यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक असून त्यांच्या निधनाने ऑलिंपिक विजेतेपदाची गुणवत्ता असलेला खेळाडू, दिलदार मनाचा, उमदा माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे. भारतीय क्रीडाक्षेत्राचा संघर्षशील, गौरवशाली अध्याय आज संपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

मिल्खा सिंग यांचं 1960 च्या ऑलिंपिक स्पर्धेतलं पदक सेकंदापेक्षाही कमी फरकानं हुकलं होतं. त्या स्पर्धेत ते अनवाणी आणि सरावाशिवाय धावले होते. त्यांच्या त्या कामगिरीने भारतीयांमध्येही वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकण्याची क्षमता आहे, हा विश्वास जागवला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिल्खा सिंग यांनी केलेला संघर्ष, बजावलेली कामगिरी, मिळवलेलं यश भारतीय क्रीडाक्षेत्राला सदैव प्रेरणा देत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिल्खा सिंग यांचं स्मरण करून श्रद्धांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *