राजेंनी ओबीसी आरक्षणासाठीही प्रयत्न करावेत!
राजेंनी ओबीसी आरक्षणासाठीही प्रयत्न करावेत!
मुंबई, दि. १४ जून :
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उदनराजे व संभाजीराजे एकत्र आले याचा आम्हाला आनंदच आहे पण या दोन्ही राजेंनी ओबीसींच्या आरक्षणासाठीही प्रयत्न करावेत, असे आवाहन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, कोणत्याही समाजाला न्याय हा मिळालाच पाहिजे मात्र राजेंनी ओबीसी समाजासाठी देखील प्रयत्न केले पाहिजेत. राजे हे सर्व समाजाचे असतात, असे सांगतानाच दोन्ही राजे ओबीसी समाजासाठी देखील प्रयत्न करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी विजय वडेट्टीवार प्रयत्नशील आहेत. याच पार्श्वभूमिवर ओबीसींच्या हक्कांसाठी २६ आणि २७ जून रोजी लोणावळा येथे ओबीसी नेत्यांचे शिबीर होत असून या शिबिराला विजय वडेट्टीवार हजेरी लावणार आहेत.
