महागाईविरोधात राष्ट्रवादीच्या महिलांचे राज्यभर आंदोलन.

0
IMG-20210513-WA0046

महागाईविरोधात राष्ट्रवादीच्या महिलांचे राज्यभर आंदोलन.

मुंबई दि. १३ मे :
मोदी सरकारने जनतेला महागाईपासून मुक्तीचे…अच्छे दिन येणार हे स्वप्न दाखवले. देशातल्या जनतेने त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्यांच्या हातात देश सोपवला परंतु जीवनावश्यक वस्तूंचे दर इतके वाढवले की जनतेला जगण्यापेक्षा मरण स्वस्त वाटू लागले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात गॅस सिलेंडरचे व टू व्हिलर गाडीचे श्राद्ध घालत निषेध नोंदवण्यात आला.

देशभरात कोरोनाचे अस्मानी संकट असतानाच केंद्रसरकारच्यावतीने महागाईचे सुल्तानी संकट जनतेवर लादण्यात आले आहे.पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल अशा सगळ्याच वस्तूंचे दर वाढवून केंद्रसरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. यामुळेच अकार्यक्षम केंद्रसरकारचा, व वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले.

यावेळी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विरोधी पक्षनेत्या दिपालीताई धुमाळ, माजी उपमहापौर दिलीप बराटे, महिला शहराध्यक्ष मृणालिणीताई वाणी, नगरसेवक सचिन दोडके, युवक अध्यक्ष महेश हांडे, भावना पाटील, पुनम पाटील, अनिता पवार ,श्वेता होनराव व महिला पदाधिकारी उपस्थिती होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *