चांदिवाल समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे अयोग्य !
चांदिवाल समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे अयोग्य !
देवेंद्र फडणवीसांची दुतोंडी भाषा योग्य नाही ..
मुंबई दि. ३१ मार्च :
तुम्ही नवीमुंबईतील भतीजाच्या एका ३०० कोटीच्या जमीन व्यवहारप्रकरणी निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत केली त्यावेळी ती चांगली होती आणि आता आमच्या सरकारने गठीत केलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या एक सदस्यीय समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करता हे योग्य नाही. फडणवीसांची ही दुतोंडी भाषा योग्य नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी फडणवीसांच्या टिकेला उत्तर दिले आहे.
परमवीरसिंग यांनी केलेल्या आरोपावर सरकारने एक सदस्यीय निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत केली असून तिला अधिकार नसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्या टीकेचा समाचार नवाब मलिक यांनी घेतला आहे.
एक सदस्यीय निवृत्त न्यायाधीशांची ही समिती सहा महिन्यात आरोपांची चौकशी करुन अहवाल सरकारला सादर करेल असे सांगतानाच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेला नवाब मलिक यांनी नवीमुंबईतील भतीजा जमीन व्यवहारात अशीच एक निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीने चौकशी केली होती. स्वतः समिती गठीत केली त्यावेळी ती ठिक आणि आमच्या सरकारने गठीत केली तर ती अधिकार नसलेली ही दुतोंडी भाषा योग्य नाही. चौकशी झाल्यावर काय सत्य आहे ते बाहेर येईलच याची आठवण नवाब मलिक यांनी करुन दिली.
