बांधकाम क्षेत्राला ठाकरे सरकारचा मोठा दिलासा.

0
20210106_230723

बांधकाम क्षेत्राला ठाकरे सरकारचा मोठा दिलासा.

रेडी रेकनर दरात 2021-22 वर्षासाठी कोणतीही वाढ नाहीः

मुंबई दि. 31 मार्च :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यवसाय आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अशा परिस्थितीत या व्यवसायाला शासनाच्या पाठबळाची आवश्यकता आहे. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन सन 2021-22
साठी वार्षिक मुल्यांकन दर तक्त्यामध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आहे.

वार्षिक मुल्यांकन दरामध्ये बदल करू नये अशी विनंती क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विनंती केली होती.

राज्य शासनाने कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर  मुद्रांक शुल्काच्या दरात सवलत जाहीर केली होती. सदर सवलत दिनांक 31.3.2021 पर्यन्त होती.  सदर सवलत संपुष्टात आली असून 1.4.2021 पासून पूर्वीप्रमाणे मुद्रांक शुल्क दर लागू राहतील.

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर केवळ महिला किंवा महिलांच्या नावाने होणा-या घरांच्या खरेदी-विक्रीवर मुद्रांक शुल्कामध्ये प्रचलित दरातून 1 टक्का सवलत देण्याची घोषणा उप मुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान केलेली होती. या घोषणेच्या अनुषंगाने महसूल विभागाने प्रस्ताव तयार करुन दिनांक 1 एप्रिल पासून केवळ महिलांच्या नावाने होणा-या घराच्या अभिहस्तांतरण किंवा विक्री करारपत्राच्या दस्तावर मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरातून 1 टक्का सवलत देण्याचे निश्चित केलेले आहे. यानुसार, राज्यात कोणत्याही महिला गृह खरेदीदाराला रहिवासी घटक म्हणजेच फ्लॅट,  सदनिका, रो-हाऊस इत्यादी खरेदी करताना प्रचलित मुद्रांक शुल्कात एक टक्का सूट देण्याचा निर्णय शासन घेत आहे. या सवलतीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित महिला खरेदीदाराला तो फ्लॅट, सदनिका, रो-हाऊस हे 15 वर्षापर्यन्त कोणत्याही पुरुष खरेदीदारास विकता येणार नाही. अशा प्रकारे विक्री केल्यास कमी भरलेले एक टक्के मुद्रांक शुल्क व लागू होणारा दंड भरण्यास ते पात्र असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *