मोदीजी, ‘त्या’ लढ्यात अटक करून तुम्हाला कोणत्या जेलमध्ये ठेवले होते !

0
20210329_203343

मोदीजी, ‘त्या’ लढ्यात अटक करून तुम्हाला कोणत्या जेलमध्ये ठेवले होते !

मुंबई, दि. २९ मार्च :
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार सार्वजनिक कार्यक्रमात धादांत खोटं बोलतात. पंतप्रधान पदावरील व्यक्तीला ते शोधत नाही. हास्यास्पद व असंबंध विधाने करून ते चर्चेचा व थट्टेचा विषय बनतात. रेल्वे स्टेशनवर चहा विकला, नाल्यातील पाण्यापासून गॅस निर्मिती, डिजिटल कॅमेरा-याबद्दलची धादांत व बिनधास्त खोटी विधाने करून टीकेचे धनी बनतात. आताही बांगलादेश मुक्ती लढ्यात आपण सहभागी होतो आपणास अटकही झाली होती असे विधान करून वाद वाढवून घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश मुक्ती लढ्यासंदर्भातील वक्तव्याचा समाचार घेतला.

पाटील म्हणाले की,’ आपले पंतप्रधान बांग्लादेश मुक्ती लढ्यात नक्की कधी अटक झाले, त्यांना कोणत्या पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते याची माहिती त्यांनीच दिली तर देशवासियांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल असे म्हणत
आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायला हवा, असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला.

बांग्लादेशच्या दौर्‍यावर असताना बांग्लादेश मुक्ती लढ्यात सहभागी झाल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याची समाजमाध्यमातून जोरदार खिल्ली उडवली जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *