‘त्या’ फोन टॅपिंगची सीबीआय चौकशी करा!
‘त्या’ फोन टॅपिंगची सीबीआय चौकशी करा!
फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आणखी एक गंभीर आरोप.
मुंबई, दि. २३ मार्च.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब आणि त्यानंतर सुप्रिम कोर्टात जाऊन गृहमंत्र्यांची चौकशी करण्याची केलेली मागणी यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज आणखी एक धमाका केला. ठाकरे सरकारमध्ये पोलीस बदल्यांचे रॅकेट कार्यरत होत आणि त्यासंदर्भातील फोन टॅपिंग करण्यात आले होते. मात्र, सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे फोन टॅपिंग प्रकरणावर पांघरूण घालत आहेत असा सणसणाटी आरोप कले आहे.
या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी या मागणीसाठ केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणार असल्याचे फडणवीसांनी म्हटलं आहे.
फडणवीस म्हणाले की, ‘गुप्तचर विभागाच्या आयुक्तांना पोलीस दलात बदल्यांसाठी रॅकेट कार्यरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यासाठी थेट अधिकाऱ्यांशी बोलणी सुरु होती. ही बाब गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालकांना ही माहिती दिली. पोलीस महासंचालकांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला विनंती करून या सर्व लोकांच्या कॉल इंटरसेप्शनची परवानगी मागितली होती. ही परवानगी मिळाल्यानंतर कॉल रेकॉर्डिंगमध्ये स्फोटक माहिती समोर आली. बदल्यांच्या रॅकेटमध्ये अनेक मोठे अधिकारी आणि राजकीय लोकांची नावं समोर आली होती.
रश्मी शुक्ला यांनी २५ ऑगस्ट २०२० रोजी ही माहिती पोलीस महासंचालकांना दिली. २६ तारखेला पोलीस महासंचालकांनी ही माहिती तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवली. या सगळ्या प्रकाराची सीआयडीकडून चौकशी होणे गरजेचे आहे, असे पोलीस महासंचालकांनी आपल्या अहवालात म्हटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याविषयी समजल्यानंतर त्यांनीही चिंता व्यक्त केली. मात्र, कारवाई करण्याऐवजी हा अहवाल त्यांनी गृह विभागाकडे पाठवला. यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
फडणवीसांच्या या आरोपानंतर राजकीय वातावरण आणखीन तापले आहे.
