परमबीरसिंग यांच्या स्वाक्षरी नसलेल्या ईमेलची शहानिशा!

0
20210210_213648

परमबीरसिंग यांच्या स्वाक्षरी नसलेल्या ईमेलची शहानिशा!

मुंबई, दि. २० मार्च  :

गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परमबीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. [email protected] या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे.

परमबीरसिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वास्तविक पाहता परमबीरसिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता [email protected] असा आहे. त्यामुळे प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *