आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीसांकडून मराठा समाजाची फसवणूक: 

0
FB_IMG_1613837123436

आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीसांकडून मराठा समाजाची फसवणूक:

मुंबई, दि. ९ मार्च :
मराठा समाजाला भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आरक्षण दिले पण ते महाविकास आघाडी सरकारला कोर्टात टिकवता येत नाही अशी ओरड भाजपाकडून वारंवार करण्यात येत आहे. परंतु भाजपा व देवेंद्र फडणवीस यांचा दावा निखालस खोटा असल्याचे सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान उघड झाले आहे. सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांना आरक्षणासंदर्भात कुठलेही अधिकार राहिलेले नाहीत असे स्पष्ट केले. मराठा आरक्षणा संदर्भातील कायदा हा या घटना दुरुस्तीनंतर करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही शुद्ध फसवणूक असून मराठा समाजाचा घात देवेंद्र फडणविसांनी केला आहे. त्यामुळे आता त्यांनी केंद्राला सांगून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही असून त्यासंदर्भात मोठ्यातले मोठे वकील लावायचे असल्यास सरकारने लावावे व मराठा समाजाला न्याय द्यावा अशी आग्रही भूमिका घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावरील राजकारण थांबवून केंद्रातील आपल्या पक्षाच्या सरकारला सांगून ठोस भूमिका घ्यावी व मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे.

मराठा आरक्षणाचा गुंता हा भारतीय जनता पक्षानेच वाढवून ठेवला आहे. हे ८ मार्चला सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीतून उघड होत आहे. सामाजिक आणि आर्थिक मागास जातींना संविधानातील तरतूदीनुसार न्याय देण्यासाठी मागासवर्गीय आयोग नेमून कायदा करण्याचा राज्यांचा अधिकारच केंद्र सरकारने काढून घेतला आहे हे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना आरक्षणच संपुष्टात आणावयाचे आहे हे लपून राहिलेले नाही. त्यासाठी अशी षडयंत्रे रचली जात आहेत. असेही प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *