राज्यात आज ३५८१६ कर्मचाऱ्यांना कोरोना लस!
राज्यात आज ३५ हजार ८१६ कर्मचाऱ्यांना कोरोना लस !
मुंबई, दि. २५ जानेवारी :
राज्यात आज ४७७ केंद्रांवर ३५ हजार ८१६ ( ७४ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात आज धुळे जिल्ह्यात सर्वात जास्त १४४ टक्के लसीकरण झाले आहे. पाठोपाठ वर्धा, भंडारा, उस्मानाबाद, सातारा याजिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले. आज पासून लसीकरण सत्राला सुरवात झाली. उद्या मंगळवार वगळता पाच दिवस लसीकरण सत्र होईल. ३१ जानेवारीला पोलिओ लसीकरण असल्याने ३० जानेवारीचे कोरोना लसीकरण सत्र होणार नाही.
आज सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून काही ठिकाणी लसीकरणाचे सत्र उशिरापर्यंत सुरु होते त्यामुळे अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो. राज्यात आतापर्यंत एकूण १ लाख ३५ हजार ७०१ जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली. राज्यात आज २६५ जणांना कोवॅक्सीन लस देण्यात आली आहे.
राज्यात सहा ठिकाणी को-वॅक्सीन लस देण्यात येत आहे. त्यातील अमरावती जिल्ह्यात आज 80 जणांना, पुणे येथे 35, मुंबई 34, नागपूर 68, कोल्हापूर 26 आणि औरंगाबाद 22 असे 265 जणांना ही लस देण्यात आली.
