काँग्रेस नेते राजाराम देशमुख यांची सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तपदी निवड!

0
IMG-20210124-WA0050

काँग्रेस नेते राजाराम देशमुख यांची सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तपदी निवड!

मुंबई, दि. 24 जानेवारी:

मुंबई, महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणार-या श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तपदी राज्य शासनाच्या शिफारशीनुसार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार काँग्रेस नेते राजारामजी देशमुख यांची निवड करण्यात आली.

गेल्या अनेक दशकापासून ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध क्षेत्रातील दुर्बल व पिडीत घटकांना वैयक्तिक व सामूहिक पातळीवर साह्य करत देशभरात एक वेगळाच आदर्श निर्माण करणा-या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तपदी सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे काँग्रेस नेते राजारामजी देशमुख यांची निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले जात आहे.

राजारामजी देशमुख यांचे वडील कै. महादेवराव देशमुख हे सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेचे थोर स्वातंत्र्य सेनानी होते.

वडिलोपार्जित देशसेवेचा व समाजकार्याचा समृद्ध वसा आणि वारसा अगदी समर्थपणे सांभाळत राजाराम देशमुख यांनी राजकीय क्षेत्रात देखिल उल्लेखनीय कामगिरी करत काँग्रेसला संघटनात्मक दृष्ट्या मजबूत करण्यात सदैव महत्वाचेमी भुमिका निभावली आहे.

सांगली जिल्ह्यातील आटपाडीचे सुपूत्र राजारामजी देशमुख यांनी सामाजिक व राजकीय जीवनात वावरत सामाजिक भान जोपासत आटपाडी व खानापूर या भागात चारा पाण्याविना दुष्काळात होरपळत असणारया हजारो जनावारांच्या चार पाण्याची व्यवस्था करत चारा छावणीचा आदर्श उपक्रम राबत शेतकरी बांधवांना धीर देण्याचे काम केले.

आटपाडी, खानापूर व आजूबाजूच्या पंचक्रोशीत दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व पाणी टंचाईवर मात करण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करून हजारो नागरीकांची तहान भागविण्याचे कार्य केले.

या सोबतच सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन, गरीब, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप, कोरोना काळात खानापूर, आटपाडी भागातील सरकारी हाॅस्पिटल मधील आरोग्य कर्मचारयांना कोरोना पासून बचाव करता यावा म्हणून पी.पी.ई किट्स, मास्क, हँड गल्बज, फेस शिल्ड, ऑक्सी मीटर यासारख्या अत्यावश्यक आरोग्य साहित्याचे मोठ्या प्रमाणात वाटप केले.

विविध सामाजिक उपक्रम राबविणा-या समाजातील शोषित, वंचित व आर्थिकदृष्ट्या गरीब जनतेप्रती सदैव संवेदनशील असणारया नेतृत्व राजाराम देशमुख यांची सबंध महाराष्ट्रात आदर्शवत सामाजिक उपक्रम राबविणा-या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तपदी झालेली निवड ही सार्थ निवड आहे आशी भावना राजकीय व सामाजिक स्तरातून व्यक्त केली जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *