मंडईमधील भाजीपाला, व्यावसायिकांना न्याय मिळवून देणार
मंडईमधील भाजीपाला, व्यावसायिकांना न्याय मिळवून देणार.
पुणे,दि. 24 जानेवारी:
भाजीपाला, फळ ,पान, पूजा साहित्य विक्रेत्यावर पुणे महापालिका व पुणे मेट्रो यांच्याकडून नाहक त्रास दिला जात आहे. त्यांना आपण न्याय मिळवून देणारा असल्याचे आश्वासन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंडई येथील व्यापाऱ्यांना दिले .
मंडई येथील व्यावसायिकांवर काही दिवसापासून अन्याय होत असल्याने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा फुले मंडई येथे भेट देऊन या व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की ,मी मेट्रोचा आराखडा पाहिला असून त्यानुसार काम करावे. मंडईतील व्यापारी जागा द्यायला तयार आहेत. परंतु त्यांचे पहिले पुनर्वसन करावे अशी त्यांची मागणी आहे व ती बरोबर असल्याचे त्यांनी सांगितले .मंडई येथील या मध्यमवर्गीय व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे.असा विश्वास त्यांनी येथील स्थानिक व्यावसायिकांना दिला.
यावेळी स्थानिक व्यावसायिकांनी त्यांच्या समस्या प्रकाश आंबेडकर यांना सांगितल्या. आहे त्या जागी पुनर्वसन करावे ,भाडेवाढ रद्द करावी ,गाळे दुरुस्ती करावी,रोज स्वछता व साफसफाई करावी ,करारनामा रद्द करावा यासारख्या मागण्या त्यांनी सांगितल्या .
यावेळी मंडई विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ काची , वंचित आघाडीचे देखरेख समिती सदस्य अतुल बहुले, पुणे जिल्हा अध्यक्ष, विनोद भालेराव, शहराध्यक्ष मूनवर कुरेशी, महिला अध्यक्ष, सीमा भालेलसईन, नितीन शेलार, भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कासुरड्डे ,राहुल खोपडे ,संतोष कुदळे ,कमलेश काची , राजू शहाणे , तसेच मंडई येथील सर्व व्यावसायिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होतेे.
