20210112_112545

बर्ड फ्लूचा 10 राज्यात शिरकाव!
अफवा व चुकीची माहिती पसरू नका..

मुंबई, दि. 12 जानेवारी :
कोरोनावर मात करत असताना आत आणखी एक संकट उभे ठाकले आहे. देशात बर्ड फ्लूने हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत १० राज्यांत बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. महाराष्ट्र, दिल्लीनंतर उत्तराखंडातही बर्ड फ्लूने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. देशात आत्तापर्यंत केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यात बर्ड फ्लू आढळला आहे.

देशात अनेक ठिकाणी पक्षांमध्ये बर्ड फ्लू आढळून आला असला तरी मानवांमध्ये मात्र अजून हे संक्रमण आढळून आलेले नाही.

महाराष्ट्रातील बर्ड फ्लू संदर्भांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान येथील समिती सभागृहात आढावा घेतला.

बर्ड फ्ल्यूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी. माणसांमध्ये या रोगाचे संक्रमण होत नसल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

या रोगाचे तात्काळ निदान होण्याकरीता राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागासाठी जैवसुरक्षास्तर 3 ही अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येइल. त्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. ज्या भागात बर्डफ्लूची लागण नाही अशा भागात अंडी व मांस 70 डीग्री पेक्षा जास्त तापमानात शिजवून खाल्ल्यास काहीही धोका नाही. गैरसमज व अफवा पसरवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *