रफी साहेबांच्या नावाचा पुरस्कार माझ्यासाठी सर्वात मोठा:शब्बीर कुमार

0
IMG-20201224-WA0034

रफी साहेबांच्या नावाचा पुरस्कार माझ्यासाठी सर्वात मोठा- शब्बीर कुमार.

तेराव्या वर्षाच्या मोहम्मद रफी पुरस्कारांंचे वितरण.

मुंबई दि. 25 डिसेंबर:
माझी 39 वर्षे संगीत सेवा झाली. मला अनेक पुरस्कार मिळाले पण आजपर्यंत मिळालेल्या सगळ्या पुरस्कारांमध्ये आज मला मिळालेला महमद रफी साहेबांच्या नावाचा पुरस्कार सर्वात मोठा आहे, अशा भावना ज्येष्ठ गायक शब्बीर कुमार यांनी व्यक्त केली.

आमदार आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे गेली बारा वर्षे महमद रफी यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ महमद रफी पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात येतो.

यावर्षीचा हा महमद रफी जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार आनंदजी कल्याणजी जोडीतील कल्याणजी शाह यांना मरणोत्तर देण्‍यात आला. त्यांचा पुरस्कार त्यांचे संगीतकार पुत्र विजू शाह यांनी स्विकारला. या जीवन गौरव पुरस्‍काराचे स्वरूप एक लाख रू. धनादेश, स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असे असून, गायक शब्बीर कुमार यांना मोहम्मद रफी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ५१ हजार रू. धनादेश आणि स्‍मृतीचिन्‍ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे. आमदार अँड आशिष शेलार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यावेळी विजू शाह यांनी कल्याणजींच्या अनेक आठवणींंना उजाळा दिला. तर शब्बीर कुमार यांनी गीत सादर करीत महमद रफी यांच्या प्रती भावना व्यक्त केल्या. वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे आज हा सोहळा संपन्न झाला. केरळचे राज्यपाल महामहीम आरिफ मोहम्मद खान प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाईन सहभागी झाले.

यावेळी प्रसाद महाडकर यांच्या जीवनगाणीतर्फे ‘फिर रफी’ या बहारदार मैफिलीत ख्यातनाम गायक श्रीकांत नारायण हे मोहम्मह रफी यांची अजरामर गाणी सादर केली. कार्यक्रमात कोविडमुळे आरोग्याचे नियम, मास्क, सोशल डिस्टसिंगची अंमलबजावणी करण्यात आली. तर
आमदार आशिष शेलार यांनी प्रास्ताविक करताना महमद रफी पुरस्कारांमागची भूमिका मांडली. यावेळी व्यासपीठावर प्रतिमा शेलार ही उपस्थित होत्या. सुत्रसंचालन संदिप कोकीळ यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *