अवकाशात 400 वर्षानंतर आज दुर्मिळ योग !
सौर मालेतील गुरु-शनी शेजारी शेजारी येणार.
मुंबई दि. 21 डिसेंबर :
अवकाशात आज एक दुर्मिळ योग येणार असून ही घटना पाहण्याची संधी दडवू नका. कारण तब्बल 400 वर्षानंतर ही घटना घडणार असून नंतर 400 वर्षानंतरच असा योग येईल. त्यामुळे आजची ही अवकाशातील दुर्मिळ घटना पाहण्यास विसरू नका.
सौर मालिकेतील सर्वात मोठा ग्रह ‘गुरु’ आणि सर्वात वेगळा ग्रह ‘शनी’ हे अत्यंत जवळ येत आहेत.
सूर्याभोवती 12 वर्षात एक परिभ्रमण करणारा गुरु आणि 30 वर्षात सूर्याची एक फेरी पूर्ण करणारा शनी यंदा पृथ्वीपासून पाहिल्यावर एका रेषेत येणार आहे. 21 डिसेंबर रोजी ही दुर्मिळ घटना घडणार आहे. 21 डिसेंबरच्या संध्याकाळी ही घटना घडत आहे. खगोल शास्त्रानुसार ही घटना दुर्मिळच नाही, तर पृथ्वीवरून पाहण्यासाठी विलोभनीय असणार आहे. हे दोन्ही मोठे ग्रह दुर्बिणीतून पाहिल्यावर एकाच फ्रेम मध्ये दिसू शकणार आहे. असा दुर्मिळ योग 800 वर्षांपूर्वी 4 मार्च 1226 ला आला होता
गुरू त्याच्या जवळ असणाऱ्या शनि ग्रहाजवळ दर 20 वर्षानंतर जातो. पण या ग्रहांचे आता जवळ येणे खूप विशेष आहे. यावेळी या दोन ग्रहांमधील अंतर फक्त 0.1 डिग्री असेल. आज सूर्यास्तानंतर जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून या दोन ग्रहांचे मिलन पाहू येईल.
21 डिसेंबर 2020 हा दिवस वर्षाचा सर्वात लहान दिवस मानला जातो. जुलै 1623 मध्ये हे दोन्ही ग्रह इतके जवळ आले होते. पण सूर्याजवळ असल्यामुळे त्यांना पाहणे अशक्य होते. यानंतर, मार्चमध्ये 1226 पूर्वी दोन ग्रह जवळ आले आणि ही घटना पृथ्वीवरुन पाहता आली.