मोदीजी, शेतकऱ्यांचं ऐका, कृषी कायदे मागे घ्या!

0
20201218_194216

मोदीजी, शेतकऱ्यांचं ऐका, कृषी कायदे मागे घ्या !

राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला…

नवी दिल्ली, दि. 18 डिसेंबर:
देशाचा अन्नदाता हजारोंच्या संख्येने दिल्लीच्या रस्त्यावर आपल्या न्याय हक्कासाठी कडाक्याच्या थंडीत 20 दिवसांपासून बसला आहे परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हट्ट सोडायला तयार नाहीत. कृषी कायदे रद्द करण्याची शेतक-यांची मागणी सरकारला मान्य नाही आणि चर्चेतून काही तोडगाही निघत नाही. आजही पंतप्रधान मोदी यांनी एका शेतकरी मेळाव्याला संबोधित केले आणि हे कायदे शेतक-यांच्या हिताचेच आहेत याचा पुनरुच्चार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी समाचार घेत सल्लाही दिला ‘सवयीप्रमाणे मोदीजींनी आज पुन्हा एकदा असत्याग्रह केला. शेतकऱ्यांचं म्हणणं ऐका, कृषी कायदे मागे घ्या, असे राहुल गांधी म्हणाले.

मोदी सरकार शेतकरी आंदोलन सुरू असताना कृषी कायदे किती फायद्याचे आहेत हे पटवून देण्यासाठी मिडिया, सोशील मीडियावर भर देत आहे. सुप्रीम कोर्टाने ही चर्चा करेपर्यंत कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा सल्ला दिला पण त्यालाही नकार दिला. शेतकरी व मोदी सरकार दोघेही माघार घेण्यास तयार नाही.

अख्खा देश शेतक-यांच्या पाठीशी उभा राहिला असताना भाजपा आणि मोदी सरकार हे मात्र शेतकरी आंदोलनाला बदनाम करत आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *