महाविकास आघाडी साकारण्यात अहमदभाईंचा सिंहाचा वाटा!

0
IMG_20201214_205115

महाविकास आघाडी साकारण्यात अहमदभाईंचा सिंहाचा वाटा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमद पटेल आयुष्यभर संघटनेसाठी झटले: शरद पवार

स्व. अहमद पटेल यांना सर्वपक्षीय नेत्यांची श्रद्धांजली.

मुंबई, दि. १४ डिसेंबर २०२०

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस नेते राज्यसभा खासदार स्व. अहमद पटेल यांची शोकसभा आय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी मान्यवरांनी आठवणांनी उजाळा दिला. अहमद पटेल म्हणजे सतत कामात व्यस्त असणारा माणूस, अशी माणसं शोधून सापडत नाहीत. त्यांनी २६ व्या वर्षी पहिली निवडणुक लढवली, शेवटपर्यंत ते कार्यरत राहिले पण कधीच मंत्री करा अशी मागणी केली नाही. त्यांनी स्वतःला पक्षासाठी वाहून घेतले होते, माझा पक्ष अधिकाधिक मजबूत कसा होईल, तो पक्ष कसा रुजले यातच त्यांना जास्त रस होता, अशी माणसे विरळाच असतात. महाराष्ट्रातील राजकारणात अहमद पटेल यांच्यामुळेच तीन पक्ष एकत्र आले. महाविकास आघाडी आकारास येण्यास अहमदभाईंचे योगदान मोठे आहे, त्यांचा यात सिंहाचा वाटा आहे, अशा शोकभावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यक्त केल्या.

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, १९८४ साली राजीव गांधी यांच्याबरोबर काही तरुण चेहरे दिसत होते त्यात अहमद पटेल हे दिसत. उभं आयुष्य त्यांनी संघटनेसाठी काम केले.सतत संघटनेचाच विचार त्यांच्या मनात असायचा. युपीएचे सरकार केंद्रता असताना दहा वर्ष त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती. युपीए सरकारच्यावेळी काही समस्या निर्माण झाली तर त्यातून मार्ग काढण्यासाठी सोनिया गांधी यांच्यावतीने, मनमोहनसिंग यांच्यावतीने ते जबादारी पार पाडत असत, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत. दहा वर्ष मनमोहसिंग यांचे सरकार हे सरकार कसे टिकेल, सर्व पक्षात सामंजस्य कसे टिकेल, मार्ग कसा काढता येईल याची जबाबदारी अहमदभाईंवर असायची. सत्तेत असूनही सत्तेतील पदांमध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही. त्यांचा स्वभाव, कल हा संघटनेसाठी काम करण्याकडे कल होता.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, अहमद पटेल यांचे अचानक दुख:द निधन सर्वांना धक्का देणारे आहे. देशांतल्या राजकारणात त्यांचे वेगळे स्थान होते. माझी त्यांच्याशी दोनवेळा भेट झाली होती, अतिशय साधेपणाने वागणे, बोलणे होते. ज्यांनी अनेक मंत्री सीएम बनवले पण ते स्वत: कधी मंत्री झाले नाहीत. पक्ष संघटन बांधणीकडे कायमच लक्ष दिले. अनेक पक्षात मंत्री होणारे असतात पण पाठीमागे राहत काम करणारे अहमदभाई होतेे.

सुरुवातीला भजनाचा कार्यक्रम झाला व त्यानंतर मान्यवरांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सर्व मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *