ईडी चौकशीतून सरनाईक यांना मोठा दिलासा.
ईडी चौकशीतून प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा.
लोंढा, पराग शहा, शेट्टी, अर्णबची चौकशी केली का ?
नवी दिल्ली, दि. 9 डिसेंबर:
प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कुठलीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ईडीला आज दिले आहेत. हा सरनाईक यांच्या साठी मोठा दिलासा आहे. प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांनी ईडीच्या नोटीसला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
प्रताप सरनाईक म्हणाले, ईडीच्या नोटीस आलेल्या आहेत ते ज्या ज्या वेळी चौकशीला बोलवेल तेव्हा तेव्हा मी जाईन. मी रिक्षा चालवण्याबरोबर ऑम्लेट पावची गाडीही चालवली याचा अभिमान आहे. पण गेल्या ३० वर्षात कायद्याचे पालन करून इथंवर पोहचलो आहे. दोन्ही फिर्यादीत माझे नाव नाही. सत्ता आहे म्हणून बायका मुलांना त्रास देत असाल तर ते योग्य नाही. हे युद्ध महाविकास आघाड़ी विरूध्द भाजपा असे सुरू आहे. काही भाजपा नेत्यांनाही माहिती आहे की माझा राजकीय बळी दिला जात आहे.
सरनाईक पुढे म्हणाले की, राजस्थानमधून आलेल्या मंगलप्रभात लोढा यांच्या संपत्तीची चौकशी केली का? भाजप आमदार पराग शाहची पाच हजार कोटींची संपत्ती, सुधाकर शेट्टी यांची शेकडो कोटींची संपत्ती, पश्चिम बंगालमधून आलेले अर्णब गोस्वामी एका चॅनेलचे मालक आहेत. हिमाचलमधून आलेल्या आणि मोठ्या संपत्तीची मालक असलेल्या कंगना हिची चौकशी केली का?
