तुम्हाला गुंतवणूक करायचीय ? मग सोन्यात गुंतवणुकीस चांगली संधी आहे!!

0
Gold Market

सोने ५० हजार रुपये तोळा, दिवाळीपर्यंत ८० हजारांवर?

मुंबई, दि. २५ जून २०२०

कोरोनाच्या संकटामुळे अख्खे जग चिंतेत असताना बाजारात सोन्याची झळाळी मात्र वाढतानाचे चित्र आहे. मुंबईच्या झव्हेरी बाजारात बुधवारी (२४ जून) ला २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८ हजार ५७५ रुपये तोळा होता. यात ३ टक्के जीएसटी अधिक केले तर एक तोळा सोन्यासाठी ५० हजार रुपये मोजावे लागले. जगभरातील सध्याची स्थिती पाहता दिवाळीपर्यंत सोने ८० हजारांवर पोहचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सोन्याचे दर एवढे वाढण्यामागे आर्थिक मंदी हे महत्वाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.कोरोना विषाणुमुळे जगभरात आर्थिक मंदीचे संकट ओढवले आहे अशा स्थितीत सोन्यामधील गुंतवणुक सुरक्षित वाटत आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांचा ओढा सोन्याकडे वाढला आहे.

तसेच जगभरात मोठी आर्थिक पॅकेजेस जाहीर केली जात असताना भारतातही रिझर्व्ह बँक एखादे आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करेल अशी अपेक्षा बाजारात व्यक्त केली जात आहे. जेवढे मोठे आर्थिक पॅकेज तेवढा मोठा फायदा सोने गुंतवणुकदारांचा होईल या आशेमुळेही सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे. बाजारातील ही स्थिती पाहता ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांनी सोन्यात केली तर त्याचे सोनेच होईल.

सोने खरेदीमध्ये भारत जगातील मोठा देश आहे. एका अंदाजानुसार भारतात तब्बल २५ हजार टन सोने असून त्यातील ६० टक्के सोने हे ग्रामीण भागात दागिण्यांच्या स्वरुपात असल्याचे समजते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *