काँग्रेस पक्षाने ‘चाणक्य’ गमावला…

0
20201125_134319

काँग्रेसने ‘चाणक्य’ गमावला..
अहमद पटेल यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांचा शोकसंदेश.
मुंबई, दि. २५ नोव्हेंबर:
ज्येष्ठ अनुभवी नेते अहमद पटेल यांच्या निधनाने कॉंग्रेसने ‘चाणक्य’ गमावला आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांची देखील मोठी भूमिका होती. अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे चाणक्य समजले जात. पक्षाला प्रत्येक प्रसंगात त्यांचा आधार होता, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

केवळ राजकीय आघाडीवरच ते सक्रीय होते असे नव्हे तर अनेक सामाजिक कार्यांशी त्यांचा जवळून संबंध होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताना अहमद पटेल यांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा आम्हाला खूप उपयोग झाला. त्यांच्या निधनाने कॉंग्रेस तसेच महाविकास आघाडीने देखील आपला मार्गदर्शक गमावला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *