बीडची घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी.
महिला सुरक्षेसाठी तातडीने कृती आरखडा तयार करा.
मुंबई दि. १५ नोव्हेंबर:
बीडमध्ये एका तरुणीला पेट्रोल ओतून जाळण्यात आल्याची गंभीर घटना घडली. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी दुर्दैवी घटना आहे. आहे. ठाकरे सरकारच्या काळात महिला सुरक्षित नसल्याचे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यामुळे आता राज्यातील महिला सुरक्षेसाठी तात्काळ कृती आराखडा बनविण्याची आवश्यकता आहे.
ऐन दिवाळीत बीडमधील एका २२ वर्षीय तरुणीला अॅसिड टाकून ठार मारण्यात आले. मग आता हाथरसच्या नावाने गळा काढणाऱ्यांचा गळा आता कोणी धरला आहे? कोणत्याही विषयाचे राजकारण करू नका असे म्हणणाऱ्या या निगरगट्ट सरकारला कधी जाग येणार आहे? राज्यात सुरक्षा विषयी बोलणा-यांना राज्यात महिला सुरक्षित आहेत का असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
प्रत्येक आठवड्याला,महिलांचा विनयभंग,जाळपोळीच्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत. तरीही शासन अजून गंभीर नाही, हे राज्य सरकारला लांच्छनास्पद आहे अशी टीकाही दरेकर यांनी केली आहे.
