व्हीजेएनटी शिक्षकांच्या वेतनप्रश्नी लवकर न्याय देऊ!

0
FB_IMG_1605008934995

व्हीजेएनटीच्या उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या प्रलंबित असलेला पदाचा प्रश्न लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडणार – विजय वडेट्टीवार.

मुंबई, दि. 10 नोव्हेंबर:

राज्यातील १४८ उच्च माध्यमिक शाळेतील १४५९ शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचाऱयांचा वेतन मान्यतेचा प्रलंबित प्रश्न लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर करून योग्य तो निर्णय घेऊ अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

मुंबईत विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली उच्च माध्यमिक शिक्षक पदास कायम वैयक्तिक मान्यता व नियमित वेतन मिळण्याबाबत बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, वित्त विभागाचे प्रधान सचिव, व बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव, संबंधित अधिकारी आणि शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.

१४८ उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील १४५९ पदांना २० एप्रिल २०१५ ला उच्च स्तरीय सचिव समितीकडून मान्यता देण्यात आली असून सदर प्रश्नावर राज्यातील कर्मचाऱयांनी १५० रिट याचिका व अनेक अवमान याचिका २०१३ पासून दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र अनेक वर्ष पाठपुरवठा करून हा प्रश सुटत नव्हता. मात्र मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात सतत बैठका घेऊन प्रलंबित असलेला पदाचा प्रश्न लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडून जलद निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *