शेतकरी प्रश्नांवर हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारू

0
Dada BJP

मुंबई, दि. ४ नोव्हेंबर:

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देण्यास राज्य सरकारकडून विलंब होत आहे. परिणामी राज्यातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारला जाईल, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी
म्हटले आहे.

पाटील म्हणाले की, विदर्भात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी काहीच हालचाल केलेली नाही. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे आघाडी सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात राज्य सरकारला आलेल्या अपयशाचा जाब नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला विचारला जाईल.

कांजूरमार्ग येथील मिठागराच्या जमिनीवरून सुरु असलेल्या वादाबाबत बोलताना पाटील म्हणाले की आघाडी सरकार नियम, संकेत बाजूला ठेवून काम करत आहे. मिठागरांच्या जमिनीवर कार शेड उभे करायचे झाल्यास त्यासाठी प्रचंड खर्च येणार आहे, परिणामी मेट्रो प्रकल्प आणखी रेंगाळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *