शिक्षक-विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी !

0
school

मुंबई, दि. ४ नोव्हेंबर.

कोरोनाच्या संकटामुळे प्रत्यक्ष शाळा सुरु करण्यात आल्या नसल्या तरी शिक्षणात खंड पडू नये म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. विद्यार्थी, शिक्षक व पालकही या प्रक्रियेत गुंतले आहेत. दरवर्षीप्रमाणे यावेळी दिवाळीची सु्ट्टी मिळेल का याबदद्ल साशंकता होती परंतु विद्यार्थी व शिक्षकांसाठी परंपरागत पध्दतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात येणार आहे व त्या संबंधिचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

अकरावी ऍडमिशनसंदर्भातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाधिवक्ता व संबंधित यंत्रणेशी चर्चा करून लवकरच हा विषयही मार्गी लावला जाईल. न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे विलंब होत आहे. ऑनलाईन अकरावी वर्गाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीच्या काळात कोणत्याही परीक्षांचे आयोजन करू नये अशा सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक रूची वाढावी व त्यांचे ज्ञानभांडार समृद्ध करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील राहील असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *