सरकार पवारच चालवतात, उद्धवजींना भेटून काय उपयोग?

0
20201029_165741

 

सांगली, दि. २९ ऑक्टोबर:

मनसचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेटू घेऊन राज्यातील वाढीव वीज बिलं आणि शेतकऱ्यांना दूध दर वाढवून द्यावेत या मागण्यासंदर्भात लक्ष द्यावे अशी विनंती केली असता राज्यपालांनी राज यांना शरद पवार यांना भेटण्याचा सल्ला दिला. यावर भाजपाने ठाकरे सरकावर तोफ डागली.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता पाटील यांनी मिश्कील भाष्य केले. पाटील म्हणाले,”राज्यपाल काय म्हणाले ते मला माहिती नाही. ते कोणत्या हेतूनं म्हटले तेही माहिती नाही. पण मला विचाराल, तर आता सध्या शरद पवारच राज्य चालवत आहेत. उद्धवजींना भेटून काय उपयोग आहे? एखादा प्रश्न सोडवायचा असेल, तर शरद पवारांना भेटावं लागेल. कारण उद्धवजी ना प्रवास करतात. ना व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे लोकांचं म्हणणं ऐकतात.

महाराष्ट्रातील २५ मोठ्या मंदिरांची व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे मीटिंग घ्या. सहा सहा महिने मंदिर बंद असल्यानं भक्त जी दक्षिणा टाकतात, ती बंद आहे. कर्मचाऱ्याचे पगार सुरू आहेत. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. अनेक मंदिर खूप सामाजिक कामं करतात. त्यांची गंगाजळी संपत चाललेली आहे. हे समजून घ्यायला पण त्यांना वेळ नाही. मग लोकांना देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे लोक असं म्हणतात की, त्यांना भेटून घ्या.

गेल्या आठ नऊ महिन्यात माझ्या एकाही पत्राला मुख्यमंत्र्यांकडून उत्तर आलेलं नाही. त्यामुळे जर अशी भावना निर्माण झाली ही वस्तुस्थिती आहे. उद्धवजींनी मी इथे बसतो, चालवण्याचं कंत्राट तुम्ही घ्या, असं केलेलं दिसतं,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *