मुंबई, दि. २७ ऑक्टोबर:
एस टी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन दिवाळीपूर्वी मिळावे यासाठी परिवहनमंत्र्यांशी तातडीने चर्चा करू असे आश्वासन रामिळाष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींना दिले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनाच्या प्रश्नावर महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.
एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे वेतन अजून मिळालेले नाही. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे वेतन एसटीच्या एक लाखाहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळाले नव्हते.
जुलै महिन्याच्या वेतनासाठी राज्य शासनाकडून निधी मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांना ७ ऑक्टोबरला वेतन देण्यात आले. पुढच्या वेतनासाठी राज्य शासनासोबत चर्चा करून लवकरच वेतन देण्याचे आश्वासन परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी आश्वासन दिले होतं. परंतु तदरम्याने मिळालेले नाही. आज या प्रतिनिधींनी शरद पवार यांची भेट घेऊन या प्रतरणात लक्ष घालण्याची विनंती केली.